पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये उद्या जिल्हास्तरीय "अ‍ॅथलॅटीक मिट २०१८" स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर LIVE 26 ऑक्टोबर 2018

जिल्ह्यातील  सीबीएसई शाळेतील विद्यार्थी होणार सहभागी
   पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता.पंढरपूर) येथील सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये सीबीएसई बोर्ड अंतर्गत सहोदया कॉम्प्लेक्स आयोजित जिल्हास्तरीय "अ‍ॅथलॅटीक मिट २०१८" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्कुलच्या प्राचार्या डॉ. उषा धपोला यांनी दिली.
     जिल्हास्तरीय "अ‍ॅथलॅटीक मिट २०१८" या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर विभागाचे उपाधिक्षक सागर कवडे, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे कॅम्पसडायरेक्टर डॉ. कैलाश करांडे आदि मान्यवरांच्या हस्ते पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूट मधेय होणार आहे.
  "अ‍ॅथलॅटीक मिट २०१८" या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या शारीरिक खेळातून त्यांचा मानसिक व बौद्धिक क्षमतेचा विकास होण्यासाठी खेळ का प्रकार आजच्या धावपळीच्या युगात अत्यंत महत्वपूर्ण होत चाललेला आहे ,यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन होणे काळाची गरज आहे.
   या स्पर्धेमध्ये वय वर्ष १२१४व १७ गटा अंतर्गत  गोळाफेकभालाफेक धावणेलांब उडी आदी सह  इतर खेळ प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सिंहगड पब्लिक स्कूल केगाव (सोलापूर) सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी (पंढरपूर), सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर (सांगोला)एमआयटी स्कूल पंढरपूरएमआयटी स्कूल सोलापूरएमआयटी स्कूल बार्शीलोटस पब्लिक स्कूलपंढरपूरऑर्चिड स्कूल सोलापूरग्रीन फिंगर स्कूल  अकलूज या शाळा मधील विद्यार्थी सहभागी होणार आहे.












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com