स्टेशनवर काटेरी झुडपे वाढल्याने प्रवाशी असुरक्षित-अशोक कामटे संघटना

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018


कामटे संघटनेने प्रवाशांची मागणी डी.आर.एम.कडे केली
सांगोला/प्रतिनिधी :     सांगोला रेल्वे स्टेशनच्या परिसरात रेल्वेच्या हद्दीत झाडी व बाभळी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. याकरिता शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने सोलापूरचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांना या समस्येचे निवेदन नुकतेच देण्यात आले आहे. 

    सांगोला रेल्वे स्टेशन दोन्ही प्लॅटफार्मच्या बाजूला मोठ्या प्रमाणात बेसुमार काटेरी झाडी वाढली असून सर्व स्टेशनचा परिसर या बाभळी झाडीने व्यापला असून या गावातील असंख्या महिला, बाल, वृध्द रेल्वेने दररोज या ठिकाणाहून प्रवास करीत असतात. त्यामुळे यावेळी याचा फायदा घेवून एखादी चोरीची घटना होवू शकते व उपद्रव्य लोकांचा याठिकाणी वावर वाढल्याने हे स्टेशन असुरक्षित आहे. बऱ्याच वर्षापासून रेल्वे प्रशासनाने येथील असणारी बाभळी न काढल्याने ती सर्वत्र प्लॅटफार्मवर विखुरल्याने येथे अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. रेल्वे प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आहे तरी संबंधीत रेल्वे प्रशासनाने येथील बाभळी, काटेरी झुडपे तात्काळ काढावीत. अशी मागणी विभागीय व्यवस्थापक, डी.आर.एम.सोलापूर, स्टेशन प्रबंधक सांगोला यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष संदीप बनकर यांनी दिली. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी पत्र देतेवेळी उपस्थित होते.











महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com