पंढरपुर तालुका पोलीस स्टेशनची खरसोळी येथील वाळु चोरट्यांवर कारवाई... पोलिस पाठलाग करताहेत हे पाहून पलायन करण्याच्या प्रयत्नात वाळुय चोरट्यांचा ट्रॅक्टर पलटी.. पंढरपूर तालुक्याच्या बहाद्दर पोलिसांनी शिताफीने ट्रॅक्टर घेतला ताब्यात!!

पंढरपूर LIVE 23 ऑक्टोबर 2018





पंढरपुर :-  आज दि. 23-10-2018  रोजी  सकाळी 09-10 वा.सुमारास पंढरपूर तालुक्यातील खरसोळी येथील अवैधरित्या वाळु उपसा करणार्‍या वाळु तस्करांवर पंढरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिस आपला पाठलाग करताहेत हे निदर्शनास आल्यानंतर चोरटी वाळु वाहतुक करणार्‍या चोरट्यांनी आपल्या ट्रॅक्टरचा वेग वाढवला व या नादात त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाला. आरोपींनी पलटी झालेला ट्रॅक्टर जाग्यावरच सोडून पलायन केले. आणि पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या बहाद्दर पोलिसांनी पलटी झालेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला. तो सरळ करुन आरोपींविरुध्द रितसर कारवाई केली. भिमा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळु उपसा करणारे दोन ट्रॅक्टरसह 01 ब्रास वाळु असा  सुमारे  10,04,000 /- रु चा मुद्देमाल जप्त करुन दोन आरोपीं वर भादवि कलम 379 पर्या का क 9,15 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे

         सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहीते सोलापुर ग्रामीण  उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे, पंढरपुर उपविभाग पंढरपुर चे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोसई वसगडे, सपोफो/फुगारे, पोना/मुळे, पोना/मोरे , पोना/इंगळे , पोकॉ/माने यांच्या पथकाने ही कारवाई्र केली.

याबाबत पंढरपूरत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार   खरसोळी ता. पंढरपूर गावचे शिवारात भिमा नदीपात्रातून बेकायदेशीर वाळु उपसा सुरू असून तेथे ट्रॅक्टरमध्ये चोरुन वाळु भरत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर वरील पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने खरसोळी गावचे हद्दीतील भिमा नदीचे पात्राजवळ बातमीचे ठिकाणी गेले असता तेथे पोलिसांना  भीमा नदीचे पात्रामधुन दोन ट्रँक्टर वाळू भरून घेवून येत असताना दिसले.  त्यावेळी त्यांना पकडने करीता वरील पोलीस स्टाफ त्यांचे दिशेने जात असताना त्या दोन्ही ट्रँक्टरवरील चालकांनी पोलिसांना पाहुन  त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर हे चालु स्थितीत पळवून घेवून जावू लागले त्यावेळी वरील पोलीस स्टाफ  त्यांचा पाठलाग करून त्यांना आडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांचेकडून ट्रॅक्टरचे पाठीमागे असणारे डंपिंग हे पलटी झाल्याने ते दोन्ही ट्रॅक्टरवरील ड्रायव्हर हे त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर व त्याचे पाठीमागील डंपिंग हे जाग्यावरच सोडून पळुन गेले. पलटी झालेले दोन्ही ट्रॅक्टरचे डंपिंग हे वरील पोलीस स्टाफ ने तेथील नागरिकांचे मदतीने  मिळुन सरळ करून घेवून डंपिंगमधून जमीनीवर पडलेली वाळु पोलिसांनी  ट्रॅक्टरमध्ये भरून घेतली आहे. मिळुन आलेल्या ट्रॅक्टरचे वर्णन खालीलप्रमाणे. 
1) 5,02,000/- रू एक स्वराज 855 कंपनीचा लाल व पांढरे रंगाचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर त्याचा चेसी                   नंबर तउघ51918112862 व इंजीन नंबर4700201101 त्यास पाठीमागे केसरी रंगाची एक डंपिंग त्यात आर्धा ब्रास वाळु किं.अं
2) 5,02,000/- रू एक स्वरात 855 कंपनीचा लाल व पांढरे रंगाचा बिगर नंबरचा ट्रॅक्टर त्याचा चेसी नंबर थटउए51618032353 व इंजीन नं 4700201102 पाठीमागे पिवळया रंगाची एक डंपिंग त्यात आर्धा ब्रास वाळु किं.अं
----------
  10,04,000/- येणेप्रमाणे वरील वर्णनाचे दोन ट्रॅक्टर त्यास, दोन डंपिंग व प्रत्येक डंपिंग मध्ये आर्धा ब्रास वाळु अशी एकुण एक ब्रास वाळु वरील स्टाफ ने ताब्यात घेवून दोन ट्रॅक्टर, दोन डंपिंग वाळु सह पुढील कारवाई करीता पोलीस ठाणेस आणून लावून पोना/1736 इंगळे यांनी दोन अज्ञात ट्रक्टर चालका विरुद्ध भा द वी स क 379,34 सह पर्यावरण कायदा कलम 9,15 प्रमाणे फिर्याद दिली आहे.










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com