* सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन *राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ *विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार - विनोद तावडे *बेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे मंत्री पंकजा मुंडे यांची अमेरीकेतील नामवंत संस्थेसमवेत चर्चा *शिधापत्रिकेशिवायही मिळेल लोह व आयोडीन युक्त मीठ - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट *

पंढरपूर LIVE 31 ऑक्टोबर 2018

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना
मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

मुंबईदि. 31 : लोहपुरुषदेशाचे माजी उपप्रधानमंत्रीगृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक,कक्ष अधिकारी ललित सदाफुलेसचिन इंगळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त व जयंतीनिमित्त उपस्थितीतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.
000

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून   एकता दौडचा शुभारंभ

मुंबईदि. 31 : लोहपुरुषदेशाचे माजी उपप्रधानमंत्रीगृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत आज सकाळी एनसीपीए (नॅशनल सेंटर फॉर परफार्मिंग आर्ट्स) येथून राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त महाराष्ट्र शासन व मुंबई महापालिकेच्या वतीने 'रन फॉर युनिटीकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाईसांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडेपशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकरआमदार राज पुरोहितमुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड, वन विभागाचे सचिव विकास खारगे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता व अखंडतेची शपथ दिली.
एकता दौडमध्ये राष्ट्रीय सेवा योजनाराष्ट्रीय कॅडेट कोरबँक ऑफ इंडियास्टेट बँक ऑफ इंडियापंजाब नॅशनल बँक यांचे कर्मचारीविल्सन कॉलेजचे विद्यार्थीस्काऊट गाईडसह क्रीडा अधिकारीप्रशिक्षक आणि बालकांपासून वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी झाले होते. सर्वजण उत्साहाने दौडचा आनंद घेत होते.
राष्ट्रीय एकतेचा संदेश नृत्यातून सादर केल्याबद्दल एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मुख्यमंत्री श्री. फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या एकता दौडचा समारोप मरीन ड्राईव्ह येथील ग्रँट मेडिकल कॉलेज जिमखाना येथे झाला.
000

पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार अंमलबजावणी
विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार
- विनोद तावडे
मुंबई, दि. 31 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 नुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लिंगडोह समितीच्या शिफारशी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पुढील शैक्षणिक वर्षात 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
आज मंत्रालयात विद्यार्थी निवडणूका संदर्भातील पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. तेव्हा श्री. तावडे यांनी महाविद्यालयीन आणि विद्यापीठ निवडणुकासंदर्भातील माहिती दिली.
श्री. तावडे यांनी सांगितलेविद्यार्थी परिषद निवडणूक कार्यक्रम 31 जुलै पूर्वी घोषित करण्यात येईल आणि शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर पूर्वी विद्यापीठ विद्यार्थी परिषद गठित करण्यात येईल. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषदेसाठीची व महाविद्यालय विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक सरळ बहुमताच्या तत्वानुसार घेण्यात येईल. संबंधित विद्यापीठामध्ये विद्यापीठ विभाग तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेसाठीची निवडणूक एकाच दिवशी घेण्यात येईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ परिसरामध्ये अध्यक्ष,सचिवमहिला प्रतिनिधी आणि आरक्षित संवर्ग प्रतिनिधींची निवड विद्यार्थी थेट मतदानाद्वारे करतील. तर विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड चार महाविद्यालय प्रतिनिधी करतील. ही प्रक्रिया दरवर्षी कालबध्द पध्दतीने व कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप टाळून राबविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विद्यापीठ विभाग विद्यार्थी परिषद आणि महाविद्यालय विद्यार्थी परिषद यांच्या निवडणूकीच्या बाबतीत मतमोजणी आणि निकालाची घोषणा मतदानाच्या दिवशीच करण्यात येईल.
निवडणू‍क लढविण्याकरिता विद्यार्थ्यांने महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या पूर्ण वेळ मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्षात नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांने मागील कोणताही विषय शिल्लक न ठेवता किंवा सत्र पुढे चालू ठेवण्याची मुभा न घेता अगोदरच्या वर्षाचे सर्व विषय उत्तीर्ण केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी एकाच वर्गात पुन:प्रवेश घेतलेला नसावा तसेच निवडणुका लढविण्यासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादाही त्या शैक्षणिक वर्षाच्या 30 सप्टेंबर रोजी त्याच्या वयाची 25 वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
००००


वृ.वि.3537                                                                              9 कार्तिक 1940( दु.4.15 वा.)
दि. 31ऑक्टोबर2018
बेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे
मंत्री पंकजा मुंडे यांची अमेरीकेतील नामवंत संस्थेसमवेत चर्चा
मुंबईदि. 31 : बचतगटांच्या महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या समुहाने आज जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमसह अमेरिकेतील विविध नामवंत संस्थांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातील ग्रामविकासाची चळवळ कशी बळकट करता येईल याबाबत विविध मान्यवरांशी चर्चा आणि आदान – प्रदान केले.  
"सर्वांसाठी घरे" हे उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी तसेच राज्यातील बेघरांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. यावेळी या कंपनीने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडणाऱ्या किंमतीत घरे बांधण्याबाबत चर्चा झाली.
येत्या दोन महिन्यात भारतात येऊन तंत्रज्ञान देवाण - घेवाणीबाबत काम करण्याचे वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींनी मान्य केले. यावेळी वेगा बिल्डींग सिस्टिम कंपनीचे चेअरमन डेव्हिड कोहेनमुख्य कार्यकारी अधिकारी केन होलेनग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ताउमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमलाफिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आदी उपस्थित होते.
स्टॅनफर्ड विद्यापीठाला भेट
समुहाने आज अमेरिकेतील नामवंत अशा स्टॅनफर्ड विद्यापीठालाही भेट दिली. राज्यातील गावे आदर्श करण्यासाठी योगदान देण्याबाबत यावेळी डॉ. कलवजीत सिंग आनंद आणि संमिना कॉर्पोरेशनचे डॉ. सुंदर कामत यांच्यासमवेत चर्चा झाली. डॉ. सनी आनंद आणि डॉ. कामत यांनी यावेळी आदर्श गाव निर्माणबद्दल कामाची माहिती सादर केली. अंजनी कोचर यांच्याबरोबर राज्यातील महिला बचतगटांच्या प्रगतीचा अभ्यास करून महाराष्ट्र  शासनाला अहवाल सादर करण्याबाबत चर्चा झाली.
साई ग्लोबल मिशनमार्फत उर्जाशिक्षणआरोग्यसेवास्वच्छ पाणी,स्वच्छता आणि सामाजिक उद्योजकता यांचा समावेश असणारे आणि त्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सहयोगी व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांची टीम  ग्रामीण समुदायांचा विकास करत आहे. त्यांच्या अनुभवांचा आणि तंत्रज्ञानाचा राज्याला खूप उपयोग होईल. त्यांच्या प्रतिनिधींना  नोव्हेबर-डिसेंबर मध्ये राज्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले.
उमेद अभियानाच्या डिल्लन कोहेननाव्या कोंडा आणि वीर शहा या तीन युवकांना येथे अभ्यासासाठी पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यानी देखील चर्चेत सहभाग घेतला.
०००० 














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com


वृ.वि.3535                                                                               9 कार्तिक 1940( दु.2.40 वा.)
दि. 31ऑक्टोबर2018
शिधापत्रिकेशिवायही मिळेल लोह व आयोडीन युक्त मीठ
- अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट
मुंबईदि. 31 : नागरिकांना शिधापत्रिकेवर आता धान्याबरोबरच रास्तभाव दुकानातून लोह आणि आयोडिनयुक्त’(डबल फोर्टीफाईड) शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर राज्यातील सामान्य नागरिकांना सुद्धा शिधापत्रिकेशिवाय शिधावाटप दुकानातून हे मीठ मिळणार आहेअशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी मुंबई येथे दिली.
आज गिरगाव येथील चित्पावन ब्राह्मण संघ सभागृह येथे नागरिकांना आयोडिनयुक्त मीठाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विभागाचे प्रधान सचिव महेश पाठकनियंत्रक शिधावाटप दिलीप शिंदेतसेच या या भागातील नगरसेविका डॉ. अनुराधा पोतदारमाजी नगरसेवक संपत ठाकूर हे उपस्थित होते.
श्री. बापट म्हणालेमीठ हे सकस अन्नघटक असून आरोग्यासाठी आयोडीनयुक्त मीठ आवश्यक असते. भारतातील आरोग्य सर्व्हेनुसार 6 महिने ते5 वर्षापर्यंतच्या बालकांना आयोडिनच्या कमतरतेमुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना  सामोरे जावे लागते. त्यामुळेच लोह व आयोडिनयुक्त शुद्ध मीठ प्रतिकिलो 14 रुपये दराने उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
नागरिकांना आयोडीन व लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमियाइतर अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. यामध्ये मुख्यत्वे महिला व लहान बालके यांचा समावेश असतो. आहारातील लोह व आयोडिनची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात डबल फोर्टिफाईड शुद्ध मीठाचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे, असेही श्री. बापट यांनी यावेळी सांगितले.
        राज्यात जुलै महिन्यात नागपूर येथून आयोडिनयुक्त मीठ वाटप सुरुवात झाली असून राज्यात आतापर्यंत 3 लाख कुटुंबांनी या आयोडिनयुक्त मीठाची मागणी केली आहे. डबल फोर्टिफाइड मीठ बाजारात 24 ते 25 रु. प्रतिकिलो या दराने विकले जाते परंतु शिधावाटप दुकानामध्ये हे 14 रु. किलो दराने मिळणार आहे यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 2022 सालापर्यंत ॲनिमिया मुक्त भारत हे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
००००















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com


वृ.वि.3534                                                                              9 कार्तिक 1940( दु.12.20 वा.)
दि. 31ऑक्टोबर2018
वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीनिमित्त
मंत्रालयात राष्ट्रीय एकता दिवस’ शपथ
मुंबई, दि. 31 : भारताचे पहिले उप प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंत्रालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्व. पटेल आणि स्व. गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवस’ निमित्त शपथ दिली.
या कार्यक्रमास आमदार प्रतापराव चिखलीकरसामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपिन मल्लिकपशुसंवर्धनदुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनूप कुमारसामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव छाया वडते यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com