बालाजी युवक मंडळाने दिला तृतियपंथियांना ‘श्री’ च्या आरतीचा मान.. वंचीत-शोषीत घटकांना सन्मानीत करणार्‍या या मंडळाचे सर्वत्र कौतुक

Pandharpur Live 18 September 2018



पंढरपूर (प्रतिनिधी):- काशीकापडी गल्ली, जुनी पेठ, पंढरपूर येथील बालाजी युवक मंडळाने आपल्या मंडळाच्या ‘श्री’ ची आरती व पुजेचा मान तृतियपंथियांना दिला. समाजातील वंचीत-शोषीत घटकांना सन्मान देणार्‍या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

श्रीगणेश ही सुख देणारी आणि दु:ख वेदना दुर करणारी देवता आहे. या देवतेला भारतातच नव्हे तर विदेशातही पुजले जाते. परंतु आपल्या भारतातच समाजातील कांही वंचीत शोषीत घटकांकडे वेगळ्या नजरेने बघणारी कांही मंडळी गणेशोत्सव तर उत्साहात साजरा करतात परंतु गणरायाच्या आरतीला फक्त बडीबडी राजकारणी मंडळीच बोलावतात. परंतु  अशा वंचीत, शोषीत घटकांना बालाजी युवक मंडळाने सन्मान मिळवून देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवून एक आगळा-वेगळा पायंडा पाडला आहे. आज पंढरीतील तृतीयपंथियांना आपल्या मंडळाच्या ‘श्री’ ची आरती व पुजा करण्याचा सन्मान देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी दिली.
 
महंमद रंगरेज (गुरु), देविदास साळुंखे (गुरु), भैया गायकवाड, दिया आगावणे, गौरी पाटोळे, गजरी, सचिन, मोगरी, दिगंबर, नागरी, विशाल, सुरेश, माऊली आदी तृतियपंथियांच्या शुभहस्ते ‘श्री’ ची आरती संपन्न झाली. 

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागेश गंगेकर, अध्यक्ष श्रीनिवास उपळकर, उपाध्यक्ष रविंद्र टमटम, अजय गंगेकर, शुभम उपळकर, मामा फलटणकर, नाना वाडेकर, आशुतोष वाडेकर, गोपाळ पोकळे, सुरज गंगेकर, बालाजी टमटम, अभिषेक टमटम, रॉक कुंदुर, सोमनाथ टमटम, नयन वाडेकर, शाम टमटम, समाधान पोळ, नाना टमटम आदींसह मंडळाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 






  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com