मंगळवेढा येथे खळबळजनक.. फिर्यादीनं न्यायालयातच आरोपीवर चाकुने केला खुनी हल्‍ला

मंगळवेढा येथे खळबळजनक.. फिर्यादीनं न्यालयातच आरोपीवर चाकुने केला खुनी हल्‍ला 

Pandharpur Live 18 September 2018

मंगळवेढा येथे फिर्यादीने न्यायालयातच  आरोपीवर चाकुने खुनी हल्‍ला चढवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रामचंद्र कोंडिबा पुजारी यांनी आरोपी पांडुरंग बंडगर यांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकू हल्‍ला केला. यात आरोपी जखमी झाला असून हल्‍ला करणार्‍या पुजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 



याबाबत अधिक माहिती अशी की, ३ मार्च २०१७ रोजी एका दुचाकी व ट्रॅक्‍टर अपघातात फिर्यादी रामचंद्र पुजारी रा. तामदरडी यांचा मुलगा संकेत (वय १६) याचा मृत्यू झाला होता. संकेत मित्र निखिल जाधवसह माचणूर येथे दहावीच्या निरोप संमारंभासाठी दुचाकीवरून जात होता. यावेळी पांडुरंग बिरा बंडगर (रा. तळसांगी) यांच्या ट्रॅक्‍टरने दुचाकीला धडक दिली. यातच त्याचा मृत्यू झाला. 
या प्रकरणी रामचंद्र पुजारी यांनी न्यायालयात गुन्‍हा नोंदवला होता. या खटल्याची सुनावणी मंगळवारी मंगळवेढ्यातील सह दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधीकारी आर. बी. नडगदल्ली यांच्या समोर होती. 
यावेळी न्यायालयाच्या आवारात खोली क्रमांक ७ समोर आरोपी पांडुरंग बंडगर आणि फिर्यादी रामचंद्र पुजारी समोरासमोर आले. मुलाच्या मृत्युचा राग मनात असणार्‍या पुजारी यांनी बंडगर याच्या डोळ्यात चटणी टाकली आणि अचानक अंगावर चाकूने वार केले. या हल्‍ल्यात आरोपी पांडुरंग बंडगर हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 
या घटनेनंतर पोलिसांनी हल्‍ला करणार्‍या पुजारी यांना ताब्यात घेतले आहे. 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com