स्वेरीत ‘अभियंता दिन’ संपन्न तर ‘ऑलंम्पस २०१८’चे थाटात उदघाटन
Pandharpur Live 15 September 2018
शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान माहित करून घ्यावे !
-फ्लीटगार्ड फिल्टर्सचे सचिव संजय कुलकर्णी
पंढरपूर- (संतोष हलकुडे) ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विषय अभ्यासताना मनात एक प्रकारचे कुतूहल निर्माण होते त्यामुळे अनेक प्रश्नाच्या उत्तरांचा शोध घ्यावा लागतो यातून संशोधनांची निर्मिती होते त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना अथवा नवीन गोष्टी करताना त्यात कुतूहल जागृत ठेवल्यास सर्वांगीण विकास शक्य होवू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान देखील जाणून घ्यावे. त्यामुळे बाहेरील विश्वातील अनुभव येवून आपल्याला समाजात वावरताना आवश्यक ज्ञान मिळू शकते.यासाठी नवअभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आपले ज्ञान वाढवावे.’ असे प्रतिपादन फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेडचे सी.एफ.ओ, कंपनी सचिव आणि प्रमुख एच आर. संजय कुलकर्णी यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘अभियंता दिनी’ व ‘ऑलंम्पस २०१८’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धा कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमूख पाहूणे म्हणून फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रा. लिमिटेडचे सी.एफ.ओ, कंपनी सचिव आणि प्रमुख एच. आर. संजय कुलकर्णी हे उपस्थितांना मागदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम्म विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी संस्थेची संपुर्ण माहिती देवून प्रास्ताविक केली. ‘ऑलंम्पस २०१८’ चे विद्यार्थी अध्यक्ष सिद्धार्थ उपासे यांनी स्पर्धेची संपूर्ण नियमावली व सविस्तर माहिती दिली. यावेळी कांचन बागल, श्वेता कदम, सहसचिवा ऐश्वर्या मासाळ यांनी देखील अभियंता दिनाबाबत मत व्यक्त केले. स्वेरीचे माजी विद्यार्थी व कमिन्स इंडिया कंपनीचे मॅनेजर अमर माळी म्हणाले की, ‘स्वेरीचे यश हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापात्र बनविण्यासाठी येथील प्राध्यापक वर्ग प्रचंड परिश्रम घेत असतात. विध्यार्थ्यांच्या यशासाठी विविध प्रयोग केले जाते.त्यामुळेच या ठिकाणी शिक्षण घेणारे विद्यार्थी परिपक्व अभियंते बनत असून स्वेरीतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे.’ असे सांगून आलेला अनुभव व त्यातून झालेला विकास याबाबत माळी यांनी माहिती दिली. फ्लीटगार्डचे हेड क्वालिटी आनंद दिवान म्हणाले की, ‘आपण काय आहोत? हे आपल्या कार्यातून दाखवून दयावे. विद्यार्थ्यांकडे विषय, ज्ञान आणि माणूसकी जर असेल तर भविष्यात त्याचा पुरस्कार जगभर होईल.विद्यार्थ्यांनी इंग्रजी संवाद साधताना संपूर्ण व्याकरणांचा वापर करावा.’ असे सांगून दिवाण यांनी विद्यार्थ्यांना कंपनीत काम करताना आवश्यक ज्ञान कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘आपण महापुरुषांचा गौरव करताना आपल्याला व समाजाला त्यांच्या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा व ऊर्जा मिळते म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळणारे कौशल्यज्ञान समाज्याच्या उपयोगी आणावेत.’असे सांगितले.यावेळी ‘ऑलंम्पस २०१८’ निमित्ताने अभियांत्रिकीचे सर्व विभाग आकर्षक पध्दतीने सजविले होते तर जागोजागी सुगंध दरवळत होता.यावेळी सुरज रोंगे, पालक संघाचे दैठणकर, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, फार्मसीच्या प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी, ‘ऑलंम्पस २०१८’ चे समन्वयक प्रा. डी.टी.काशीद, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, सचिवा दिपान्विता डेब, खजिनदार नितीन कदम, ज्ञानराज तेलंग, विविध विभागाचे प्रमुख,प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन ऋतुराज जाधव व आकांक्षा पाटील यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com