केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे 20 लाखांचा धनादेश

पंढरपूर LIVE 4 सप्टेंबर  2018

 मुंबईदि. 4 : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब,नांदेडतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला.
यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंगचहल सिंगप्रेमज्योतसिंग चहलअमरीक सिंग वासरीकरशेरसिंग फौजीगुरूंदर सिंग बावाएकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते.




श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थाननृसिंहवाडीतर्फे पाच लाखांचा धनादेश

नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव स्थानतर्फे केरळ पुरग्रस्तांसाठी पाच लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलकृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोतसंस्थानचे अध्यक्ष विकास पुजारीसचिव गुंडू पुजारीविश्वस्त अवधूत पुजारीआशिष पुजारीप्रशांत कोडणीकर उपस्थित होते.
पुरग्रस्तांना राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या मदतीचा ओघ सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला राज्यातील जनता व विविध सामाजिक संस्थामंदिर संस्था मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करीत आहेत.

दोशी हिंदू सभा हॉस्पिटलच्यावतीने दोन लाखांचा धनादेश

घाटकोपर मधील हिराचंद जयचंद दोशी हिंदू सभा हॉस्पिटलच्यावतीने केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आला.
हॉस्पिटलचे अधिकारीकर्मचारी यांनी एक लाख रूपयांचा निधी एकत्र केला. त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक मगनलाल दोशी यांनी एक लाख रूपयांचे योगदान दिले. असा दोन लाख रूपयांचा  धनादेश हॉस्पिटॅलचे संचालक डॉ. वैभव देवगिरकर यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. हॉस्पिटलच्यावतीने जेनेरिक औषध मोहीम विशेषत्वाने राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.









  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com