मतदारसंघाच्या विकासाची व्याख्या जाणूनबुजून नेतेमंडळीनी बदलली आहे - संतोष माने

Pandharpur Live 16 September 2018


मंगळवेढा तालुक्यातील एक तरुण समाजसेवक संतोष माने यांनी आपल्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्या व्यथा एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे मांडल्या आहेत. यामध्ये त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील जनतेला विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगतानाच याला जबाबदार येथील राजकीय नेते असल्याचा आरोपही केला आहे. खाली विस्तृतपणे त्यांचे म्हणणे त्यांच्याच शब्दात.

दहा वर्षांपासून जिल्हा दुधसंघ तुमच्या ताब्यात आहे.दर वर्षी दुध दरवाढी साठी शेतकरी आंदोलन करतात.कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना किंवा निर्णय तुम्ही घेतला नाही.दुध दरवाढ द्यायाची ठरल्यावर शेतकर्‍यांची माहिती उपलब्ध नसल्याचे कारण तुम्ही सांगितले.दुधदरप्रश्न संपवण्यासाठी तुम्ही दुधाला अनुदान द्यायचे कबुल केले असूनसुद्धा शेतकर्‍यांचा दुध उत्पादन खर्च जास्त आणि विक्री किंमत कमी अशी वस्तुस्थिती आहे.येणार्‍या काळात दुध दरासाठी आंदोलन होऊ नये यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय दुग्ध उत्पादकासाठी घेण्यात आला नाही.

2019 च्या निवडणुका जसजश्या जवळ येऊ लागल्या आहेत तसतश्या मतदारसंघातील सर्व नेतेमंडळी त्यांच्या प्रत्येक भाषणात पाणीप्रश्नावर बोलत आहेत.इतक्या दिवसात यांना पाणीप्रश्न आठवला नाही काय? शाळा शिकून पदवी घेतल्यानंतर सुद्धा तरुणांना 250 रु हजरीने विहिरींना जावे लागत आहे,जनावरांना चारा घालण्यासाठी उस 3000 रु टनाने विकत घ्यावा लागत आहे ते पैसे जमवण्यासाठी मजूरी करावी लागत आहे,सफाई कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत,अपंगांचे प्रश्न सुटले नाहीत,शेतकर्‍याचा कोणताही प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही,आजघडीला मंगळवेढ्यातील तरुण नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी धडपड करत आहे,सहकारी संस्थामधील कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत.जनतेने विचार करायला पाहिजे हे नेते 10 वर्षांपासून सत्तेत आहेत कोणाच्याही जीवनात कसलाही फरक पडला नाही.पुन्हा तेच प्रश्न तीच आंदोलने दरवर्षीप्रमाणे चालू आहेत.मतदारसंघात चाललंय काय?

वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करणे,मेळाव्याला वाहने देणे,देवळांना देणग्या देणे या गोष्टी म्हणजे मतदारसंघाचा विकास नव्हे.विकासाची व्याख्या जाणूनबुजून नेतेमंडळीनी बदलली आहे.

मंगळवेढ्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर पर्यटन विकासाच्या माध्यमातून व्हावी म्हणून कोणत्याही प्रकारचा ठोस आराखडा तुमच्याकडे नाही.वारी संपल्यावर दोन महिने त्याची दुर्गंधी पंढरीत असते हि वस्तुस्थिती आहे.खेडे गावांचे प्रश्न तसेच आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आराखडा तुमच्याकडे उपलब्ध नाही.









  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com