बालाजी युवक मंडळाने दिला पंढरपूर शहर स्वच्छ ठेवणार्‍या भगिणींना सन्मान

Pandharpur Live 17 September 2018


पंढरपूर (प्रतिनिधी):- काशीकापडी गल्ली, जुनी पेठ, पंढरपूर येथील बालाजी युवक मंडळाने आपल्या मंडळाच्या ‘श्री’ ची आरती व पुजा पंढरपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी भगिणींच्या शुभहस्ते करुन पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्याचं महान कार्य करणार्‍या या महिला भगिणींना सन्मान दिला.

गणेशोत्सव काळात नुसता डामडौल करण्यापेक्षा या उत्सव काळात समाजासाठी व आपल्या शहरासाठी विशेष कार्य करणार्‍या व्यक्तींना सन्मान देणं त्यांचं आदरातिथ्य करणं व विविध सामाजिक उपक्रम राबवणं अत्यावश्यक आहे. हे सामाजिक भान आमच्या बालाजी युवक मंडळाने ठेवुन यावर्षी गणेशोत्सव काळात वेगळं असं काहीसं करण्याचा संकल्प घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचारी भगिणींचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या शुभहस्ते ‘श्री’ ची आरती केली. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास उपळकर यांनी दिली.
 
गंगुबाई खिलारे, मंदु मेढा, सीता पाटोळे, सुलोचना नाईकनवरे, सायरा बंगाळे, माया यादव, कमु मेढा, धनाजी कांबळे, मसु चंदनशिवे, दत्ता ढवळे, मसुआबा, अप्पा माने आदी सफाई कर्मचारी बंधु-भगिणींच्या शुभहस्ते ‘श्री’ ची आरती संपन्न झाली. 

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नागेश गंगेकर, अध्यक्ष श्रीनिवास उपळकर, उपाध्यक्ष रविंद्र टमटम, अजय गंगेकर, शुभम उपळकर, नाना वाडेकर, आशुतोष वाडेकर, गोपाळ पोकळे, जनार्धन पोकळे, मनोज गंगेकर, आशुतोष वाडेकर, सुरज गंगेकर, बालाजी टमटम, अभिषेक वाडेकर, अभिषेक टमटम, लखन भिंगारे, रॉक कुंदुर आदींसह मंडळाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com