प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या नुतन महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती....

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018


पंढरपूर येथील शिवयोगी मंगल कार्यालय येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. आरती ओंकार बसवंती यांच्या वतीने महिला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती, बचत गटांतील महिलांना उद्योगांविषयीची माहिती सांगण्यात आली. यावेळी पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा आदी तालुक्यातुन बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचच्या नुतन महिला पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी जिल्हा संघटक कामिनी सुभाष जाधव, सरचिटणीस भाग्यश्री बाळकृष्ण विभुते, ओबीसी तालुका अध्यक्षा मंगल मारुती पाटोळे, सौ.अनिता सुनील हिल्लाळ (मंगळवेढा तालुकाध्यक्षा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. 

यावेळी नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विचार मंचचे जिल्हाध्यक्षा आरती बसवंती यांच्या हस्ते सत्कार करुन नियुक्तीपत्रे देण्यात आले.या वेळी नरेंद्र मोदी विचार मंच चे महामंत्री ओंकार बसवंती, तालुका अध्यक्षा उल्का विष्णुपंत लटके,शहर अध्यक्षा मंदोदरी भारत मुळे तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते.








  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com