पंढरपूर एशियन मार्शल आर्टच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर LIVE 3 सप्टेंबर  2018

पंढरपूर -  एशियन मार्शल आर्ट या संस्थेच्या वतीने शिवयोगी मंगल कार्यालय, लिंकरोड, पंढरपूर येथे कराटे,ज्यूडो, किक बॉक्सिंग, म्युथाई बॉक्सिंग बॉक्सिंग इ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. नुकतीच या संस्थेतील विद्यार्थ्यांनी पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे झालेल्या जित- कुने -दो या कराटे स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये सहभागी झालेल्या 20 विद्यार्थी मिडेलसाठी पात्र झाली. करकंब येथे थर्ड चॅम्पियनशिप ट्रॉफीचे मानांकन मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शिवयोगी मंगल कार्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कुंभार सर, विश्वंभर पाटील सी ए, जनकल्याणाच्या हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे आदि मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कराटे क्लासेसचे विकास घोडके, परवेज सर, योगेश्वर भोसले सर, आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. यशस्वी सर्व मुलांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती  कराटे क्लासेसचे शिक्षकांनी दिली. यावेळी पंर्ढपूर लाईव्हशी बोलताना शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 








  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com