स्वेरीने केली अनोखी रक्षाबंधन साजरी

पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट  2018


 स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पालवीमध्ये साजरा केला रक्षाबंधन सण साजरा.  
‘पालवी’ला दिला मेसातील विद्यार्थ्यांनी मदतीचा हात !  
पंढरपूर- (संतोष हलकुडे) रक्षाबंधन! तसा भाऊ-बहिणीच्या अनोख्या नात्याचा दिवस! सर्वत्र विविधतेने व उत्साहात साजरा करत असल्याचे पाहतो. अनेक भाऊ हे या पवित्र सणाच्या निमित्ताने बहिणीसाठी महागड्या वस्तू, साडी, भेट वस्तू ओवाळणी म्हणून देत असतात. परंतु नेहमी विविध आणि समाजोपयोगी उपक्रम करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्वेरीतील विद्यार्थी मात्र याहून वेगळे कार्य करून समाजापुढे एक आदर्श उभा केलाय! या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे  पंढरपूर पंचक्रोशित मुक्तकंठाने कौतुक होत आहे.
            याचे झाले असे ! रविवारच दिवस, अभियांत्रिकीच्या साधारण १५० विद्यार्थी कोर्टी रोडला असलेल्या ‘पालवी’कडे महाविद्यालयाच्या बसमधून मार्गस्थ झाले. पालवीच्या आवारात चिमुकली मुले खेळत होती, बागडत होती आणि अचानक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहून मुले स्तब्ध झाली. काही समजण्याच्या आत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी  पालवीतील सभागृहातच कार्यक्रम घेण्याचे ठरविले. सुरुवातीला ऋषभ जाधव या विद्यार्थ्याने पुढे येऊन प्रास्तविकात  ‘रक्षाबंधन’ पालवी’मध्ये का  साजरा करायचा ? हे सांगितले. या निमित्ताने  ‘मेसा’ची सचिवा ज्योती देशमुख, नितीन टेळे, आकाश मेटे, उमेश भक्ते, स्नेहल भोंडवे तसेच मेकॅनिकल विभागप्रमुख प्राएसआरगवळीप्राएसवायसाळुंखे यांनी पालवीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यानंतर चिमुकल्याच्या चेहऱ्यावर उत्साह वाढत होता. पालवीच्या सचिवा डिंपल घाडगे यांनी मनोगतातून स्वेरीच्या आजच्या प्रयोजनाबाबत चिमुकल्यांना सांगून स्तुत्य उपक्रमाबद्धल गौरवोदगार काढले. यानंतर ‘पालवी’चा वचननामा सादर केला. ज्यामध्ये पालवीमधील विद्यार्थ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे वर्णन केले होते. त्या भावपूर्ण वचननाम्याने प्राध्यापक व स्वेरीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उमटले. यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. पालवीच्या चिमुकल्यांनी विठ्ठल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या.यावेळी खाऊवाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालवीत चिमुकल्या हातांनी बनविलेल्या वस्तूही विद्यार्थ्यांनी विकत घेतल्या.याप्रसंगी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी बाजारातून महागड्या राख्या विकत घेणे टाळून पालवीतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक राख्या घेतल्या त्याच बरोबर चिमुकल्यांना मदत म्हणून सतरंज्या, जेवणाची ताटं, लेखनाचे साहित्य, वह्या, पुस्तके आदी मिळून जवळपास साडे नऊ हजार रुपयांचे योगदान पालवीसाठी दिले. वायफळ खर्च न करता स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पैशाचा सदुपयोग व्हावा या हेतूने वायफळ जाणारा खर्च पालवीतील चिमुकल्यांना दिल्या. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी पालवीतील चिमुकल्याबरोबर घालविला. या कार्यक्रमाच्या  यशस्वितेसाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशा दर्शक मार्गदर्शनाखाली, मेसा समन्वयक प्रा..के.पारखे यांच्या नेतृत्वाखाली पालक प्रतिनिधी म्हणून सिद्धेश्वर रणदिवेडॉबीशिंदे, प्रा.एसबीभोसलेप्राडीटीकाशीद यांच्या सहकार्याने ओंकार पोरेसुदर्शन शिंदेअनिकेत चव्हाण यांसह जवळपास १५० विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या मेसा विभागातील मेसा तथा मेकॅनिकल इंजिनीअरींग स्टुडंट्स असोसिएशन अंतर्गत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कोरे यांनी केले तर मेसा विद्यार्थी अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आभार मानले.




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com