शिक्षणासाठी काय पण! तुंगतच्या विदयार्थ्यांचा 'एस टी' अडवुन रोजचा'प्रवास'

पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट  2018


    तुंगत  ता.पंढरपूर याठिकाणी एसटी बस थांबत नसल्यामुळे  एसटी बस आडवुन विदयार्थी प्रवास करीत आहेत 

पंढरपूर/ वार्ताहर

      पंढरपूर-मोहोळ रोडवर पंढरपूर पासून १५ किमी मी.अंतरावर असलेल्या तुंगत येथे एस.टी.महामंडळाच्या सर्व गाडयानां प्रवासी चढ उतार करण्यासाठी थांबा असुनही केवळ चालक - वाहकांच्या असहकार्य व अडमुठेपणामुळे येथील प्रवाशानां रोजच एस टी अडवून प्रवास करावा लागत आहे.

         तुंगत येथून अनेक शळा,महाविदयालयात शिक्षण घेण्यासाठी तर काही नौकरी ,व्यवसायानिमीत्त एस टी ने प्रवास करणा-यांची संख्या लक्षणीय आहे. शिवाय शाळा - महाविद्यालयातील विदयार्थी व इतर प्रवाशांनी मासिक पास घेऊन दररोज ये जा करतात पंरतु चालक - वाहकांच्या आडमुठया धोरणामुळे तुंगतचे सेटींग नाही,स्टाँप  नाही,जागा नाही,लांब पल्याची गाडी आहे वैगरे कारणे सांगत प्रवाशांची टाळाटाळ केली जात आहे.असा रोजच त्रास होऊ लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.

             यापूर्वीही अनेकदा पंढरपूर, सोलापूर एस टी आगारप्रमुखानां निवेदन देऊनही काही उपयोग झाला नाही.गेल्या महिन्यापूर्वी ग्रमस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले त्यावेळी महामंडळाचे  एन.बी जाधव यांनी यापुढे तुंगत येथे सर्व गाड्या थांबतील असे आश्वासन दिले होते. यानंतर पुढे ३-४ दिवस एस टी चे कर्मचारी येथून प्रवासी गाडीत पाठवू लागले.मात्र आता कर्मचारीही थांबत नाही अन् एस टी ही थांबत नाही. न विचारता गाडीत बसल्यास तुंगतच्या प्रवाशांना पुढील थांब्याचे तिकीट घेऊन आर्थिक भूर्दड सोसून प्रवास करावा लागत आहे,असे का म्हणून विचारले असता वाहकांकडून अपमानास्पद बोलणे ऐकून घ्यावे लागत आहे.याकारणाने येथील विद्यार्थी,पालक,नागिरक खूप संतापले असून महामंडळाने सक्तीने सर्व गाड्यानां थांबा द्यावा अन्यधा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रमस्थांनी दिला आहे.

   बेजबाबदार कर्मचारी अधिका-यांवरती कारवाई करा 
         तुंगत येथे एसटी बस थांबत नसल्याच्या संदर्भांत विनंत्या अर्ज ,ग्रमसभेचा ठराव वरिष्ठ अधिका-यांना देऊन व समक्ष भेटूनही गाड्या थांबत नसतील तर अशा बेजबाबदार व कारभार शुन्य असणा-या कर्मचारी व अधिकारी यांच्यावरती एसटी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी
               - आगतराव रणदिवे ( सरंपच,तुंगत)

                     विदयार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान 
         रोज आम्ही एसटी बसथांब्याच्या ठिकाणी शाळा  व काँलेजला जाण्यासाठी येत असतो. शासनाच्या सुविधेनुसार मासिक विदयार्थी सवलत पास काढण्यात आले आहेत. परंतु शाळेच्या वेळेत एसटी तुंगतमध्ये थांबत नाही यामुळे आम्हाला आठवडयातील दोन ते तिन दिवस वडीलांना सोबत घेवुन दुचाकीवरती पंढरपूररला जावे लागत आहे. तसेच काही वेळी एसटी न थांबल्यामुळे उशीर झाल्याने शाळेला सुट्टी तर कधी पहिले एक दोन तास बुडल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. 
                 - ञस्त विदयार्थी,  तुंगत 



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com