शहीद मेजर कुणागीर गोसावी स्मारक परिसरात वृक्षारोपन

पंढरपूर LIVE 18 आॅगस्ट  2018

वनमंत्र्यांच्या प्रेरणेतून पंढरपुरात एक  'वृक्ष शहीदांसाठी'
* स्वराज्य फाउंडेशन करकंबचा नावीन्यपूर्ण उपक्रम 
* तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांनी केले कौतुक

पंढरपूर (प्रतिनिधी) :  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती घडविण्यासाठी 'वनसत्याग्रह' सुरु केला आहे. तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवड मोहीम हि राज्यभर चळवळीच्या रूपाने उभी झाली आहे. वनमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तळागाळातील सामान्य माणूसही वृक्षलागवडीकरिता स्वतः हुन पुढाकार घेऊ लागले आहेत, असे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे.  देशासाठी हुतात्म्य पत्करलेल्या शहीदांसाठी तसेच सिमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी स्वराज्य फाउंडेशन करकंबने  त्यांच्या स्मृतींना कायम स्मरणात ठेवण्यासाठी 'एक वृक्ष शहिदांसाठी' हा अभिनव उपक्रम हाती घेऊन ५०१ वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधील नागरोटा सांबा सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूर - वाखरीचे सुपुत्र तथा मेजर कुणाल मुन्नागिर गोसावी यांना वीरमरण आले होते. स्वराज्य फाउंडेशन करकंबच्या वतीने वाखरी येथे शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्या स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शहिद मेजर कुणाल गोसावीयांचे बंधू अमित गोसावी, पंढपूरचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक किरण घाडगे, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत बागल, अमोल शेळके आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता बोरिवली नॅशनल पार्कचे वनरक्षक तथा स्वराज्य फाउंडेशन करकंबचे संस्थापक अर्जुन शिंदे, धर्मनाथ लोंढे लालजी पवार, किरण देशमुख, संजय गायकवाड, विशाल घाडगे, गौरव शिंदे, सुनील लोंढे, सुनील गायकवाड, मुकुंद लोंढे आदींनी अथक परिश्रम घेतले. 

प्रत्येकाने एक तरी झाड लावावे आणि वसुंधरेचे ऋण फेडावे, ती संधी वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत वनमंत्र्यांच्या प्रेरणेतून पंढरपुरात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘एक वृक्ष शहीदांसाठी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम स्वराज्य फाउंडेशन करकंबने राबविला आहे. या उपक्रमात ५०१ वृक्ष लावून शहिदांच्या कतृत्वाला नमन करण्यात आले.


समाजाप्रती आपण काय करतो किंवा काय केलं पाहिजे ही भावना महत्वाची आहे. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये वनरक्षक पदावर कार्यरत असलेल्या अर्जुन शिंदे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या स्वराज्य फाउंडेशन करकंबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे, लावलेल्या वृक्षांच्या रूपाने क्रांतिवीरांचे स्मरण होत राहील, त्यांचा ज्वलंत इतिहास अखंड तेवत राहिल, अशी भावना तहसीलदार मधुसूदन बर्गे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी व्यक्त करीत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले. याशिवाय न्यू इंग्लिश स्कुल आणि  महात्मा आनंद स्वामी सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
बॉक्स
वृक्षांच्या रूपाने होईल शहिदांचे स्मरण... 
प्रत्येक धर्मात वृक्षाचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडं लावणं हे एक संविधानिक कर्तव्यही आहे, असे आमचे लाडके वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार नेहमी सांगत असतात. हि बाब लक्षात घेऊन शहिदांचा - वीरांच्या नावातून पंढरपूरचा जाज्वल्य इतिहास जगाला कळावा व त्यांचे कायम स्मरण राहावे, यासाठी यावर्षी प्रथमच आम्ही स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने ५०१ वृक्षांची लागवड केली आहे. 
अर्जुन शिंदे वनरक्षक बोरीवली नॅशनल पार्क तथा स्वराज्य फाउंडेशन करकंब



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com