प्रतिकार हाच डेंग्यूवर उपचार...
पंढरपूर LIVE 28 आॅगस्ट 2018
सध्याच्या वातावरणात विविध आजार डोके वर काढतात. डासांमुळे रोगांच्या संख्येत सध्या खूप वाढ होत आहे. त्यामध्ये डेंग्यू हा सध्या आढळणारा प्रमुख आजार आहे. या आजाराची लक्षणे, उपाय आणि प्रतिकार कसा करावा याबाबत…. - रवींद्र राऊत, जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर
पाऊस आणि सध्याच्या वातावरणात डासांची पैदास होते. त्यामुळे साहजिकच डासांच्या चाव्यामुळे पसरणारे रोग आता मोठ्या प्रमाणावर आढळतात. यात अलिकडे प्रामुख्याने आढळणारा रोग म्हणजे डेंग्यू डासामुळे पसरवणारा विषाणुजन्य आजार आहे. एडिस डासाच्या मादीच्या चाव्यामुळे डेंग्यूचा विषाणू पसरतो. एडिस डासाच्या अंगावर पांढरेपट्टे असतात. म्हणून त्यास टायगर मॉसक्युटो म्हणतात. हा डास दिवसा चावतो. डास लोंबकळण्याच्या वस्तू उदा. दोरी, लाईटची वायर, छत्री, काळे कपडे इत्यादी ठिकाणी असतात.
एडिस डास वाढण्याच्या जागा : एडिस डास घरात घराभोवतालीच्या साठलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो. पाणी कूलर्स, फ्रीज, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलेली भांडी यांमध्ये डासाच्या अळ्यांची उत्पत्ती होऊ शकते.
उत्पत्ती रोखणे महत्वाचे : एडिस डासाची उत्पत्ती रोखणे हा डेंग्यूचा प्रतिकार करण्यासाठी उत्तम उपाय आहे. घराभोवती, परिसरात पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू साठु देऊ नये. पाण्याची भांडी, ड्रम, रांजण झाकून ठेवावेत. घरावरील टाक्यांना झाकणे बसवावे. शौचालयाच्या व्हेट पाईपला जाळी बसवावे. परिसरातील डबकी वाहती करावी अथवा बुजवावीत. मोठ्या डबक्यात गप्पी मासे सोडावेत.
डास अळी आढळल्यास काय करावे? : पाणी साठे मोकळे करावेत, पाणी गटारात न ओतता जमीनीवर ओतावे, पाणी साठ्यात अळीनाशकाचा वापर करावा.
डेंग्यूची लक्षणे : तीव्र ताप येणे, डोकेदुखी, उलटी होते, अंग दुखणे, डोळ्यांच्या खोबणीत वेदना होतात. अंगावर लालसर पुरळ येते , पोटात दुखते, गंभीर आजारी असणाऱ्यास रक्तस्त्राव होतो.
डेंग्यूवरील उपचार : डेंग्यूवर कोणताही ठोस नेमका उपचार नाही. तापासाठी पॅरासिटामेल तसेच तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. भरपूर पाणी प्यावे, पूर्ण विश्रांती घ्यावी, वैद्यकीय सल्यानुसार उपचार घ्यावेत, तापामध्ये काळजी घ्यावी. कोणताही ताप अंगावर काढू नका, रक्ताची तपासणी करुन घ्यावी. हिवतापाची तपासणी प्रत्येक सरकारी दवाखान्यात मोफत होते. उपचारही मोफत होतात. तापामध्ये कोणत्याही गोळ्या योग्य सल्याशिवाय घेऊ नये.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com