जागतिक छायाचित्र दिनानिमित्त पंढरीत फोटोग्राफर संघाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन

पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट  2018

पंढरपूर ता.17 ः  पंढरपूर फोटोग्राफर व व्हीडीअो ग्राफर असोसिएशन (संघ) च्या वतीने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त रविवार दिनांक 19 रोजी पंढरपूर शहर व तालुक्यातील फोटोग्राफर व व्हीडीओ ग्राफर बांधवांसाठी नांदेड येथील सुप्रसिध्द प्रा.राघवेंद्र कट्टी यांचे सिनेमॅटिक कार्यशाळेचे आयोजन इसबावी येथील श्रीराम मंगल कार्यालय (दुध पंढरी शेजारी )करण्यात आले असल्याची माहीती संघाचे अध्यक्ष दिनेश शिळ्ळे व सचिव विलास साळुंखे यांनी दिली.


यावेळी सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचे उदघाटन पंढरपूर तालुक्याचे जेष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक व आमदार भारत भालके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास पंढरपूरचे उपनगराध्यक्ष विशाल मलपे, युवक नेते उमेश परिचारक, उद्योजक व धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, बालरोग तज्ञ डाँ.शितल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी फोटोग्राफर व व्हीडीओ ग्राफर बांधवांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सदर कार्यक्रमामध्ये फोटोग्राफर बांधवांनी व्यवसाय व्यतीरिक्त समाजसेवा, राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिक असे विविध पुरस्कार मिळवलेल्या फोटोग्राफर बांधवांना गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध स्तरावरील फोटोग्राफीचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून यावर्षी प्रथमच संघाच्या वतीने उपस्थित फोटोग्राफर यांचा एक लाख पर्यतचा एक वर्षाचा मोफत विमा उतरविण्यात येणार आहे. त्यादिवशी मोफत संगणक दुरुस्ती सेवाही देण्यात येणार आहे. तरी पंढरपूर शहर व तालुक्यासह जिल्हयातील फोटोग्राफर व व्हीडीओग्राफर बांधवांनी याचा लाभ घ्यावा.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com