श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पंढरपूर LIVE 17 आॅगस्ट  2018

 

 राष्ट्रउभारणीसाठी युवाशक्तीला विधायक वळण देणे गरजेचे. - गटशिक्षणाधिकारी सौ. सुलभा वठारे
पंढरपूरः-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७२ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सौ. सुलभा वठारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

            
भारतमाता प्रतिमा पूजनानंतर सुरवातील संकेत कदम, स्वप्ना सावंत व आदर्श वेर्णेकर यांनी भारतातील राज्यघटनेपासूनसंरक्षण व्यवस्थासामाजिक परिस्थिती,बालमजुरी, संवेदनशील स्थिती,  वस्तुस्थिती आणि भविष्यातील भारत यातील फरक तसेच महागाई व भ्रष्टाचार या विषयावर अत्यंत पोटतिडकिने विचार मांडून देशाने आपल्यासाठी काहीतरी करण्याऐवजी आपण देशासाठी काहीतरी केले पाहिजे असे सांगणारी अभ्यासपूर्ण भाषणे दिली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून स्वेरीयन’ या त्रेमासिकाचे तसेच चारही महाविद्यालयाच्या विविध विभागांच्या अहवालाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी वठारे म्हणाल्या की, ‘आपल्या सुजलाम सुफलाम असणाऱ्या भारत  देशात लोकशाहीचा पाया, विविधतेत एकता, धर्म,जात, पंथ, रूढी, परंपरा एकत्रित नांदताहेत असे असताना मात्र एकीकडे समान अनुभूतीचा मात्र ऱ्हास होत आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी शासनाला परिपत्रक काढावे लागते. हे थांबले पाहिजे. म्हणून राष्ट्रउभारणीसाठी सध्याच्या युवाशक्तीला विधायक वळण देणे गरजेचे आहे.’ असे आवाहन करून हा महत्वपूर्ण बदल स्वतःपासून करावा. हे सांगून ‘स्वेरीत मोबाईलचा वापर नाही, सर्वजन निर्व्यसनी आहेत, अशा अनेक बाबीमुळे स्वेरीचे कार्य उल्लेखनीय वाटते.’ हे देखील सौ.वठारे यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी सौ.वठारे यांनी ‘एस.एस.जी.१८’ हे अॅप डाऊनलोड करून त्यातील जिल्हा, तालुका निहाय प्रश्नांची उत्तरे द्यावीत.’ असेही आवाहन केले. 


यावेळी संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस.कागदे,सुरज रोंगे, डिप्लोमा पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.डी.सोनवणे,डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवेविद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम पवार, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर,उपप्राचार्य एस.एन.कुलकर्णी, चारही महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख,प्राध्यापक वर्गप्रा.यशपाल खेडकर,मधुकर मोरे, योगेश कदम तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचालन रोहित कांबळे व ऋशभ जाधव यांनी खास शैलीत करून आभार मानले .



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com