श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी वैद्यनाथ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप
पंढरपूर LIVE 21 आॅगस्ट 2018
परळी दि.20
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी देशाच्या कानाकोपर्यातुन भक्त परळीत दर्शनासाठी दाखल झाले आहेत. राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांचे श्रावणमास तपोनुष्ठान सोहळा वैद्यनाथ मंदिर परिसरात 11 ऑगस्ट पासुन सुरु आहे. वैद्यनाथाच्या दर्शनासाठी व डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे. रविवारी व सोमवार सकाळपासुनच दोन्ही ठिकाणी भक्तांची रिघ लागली होती. त्यामुळे वैद्यनाथ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले आहे.
दुसरा श्रावण सोमवार असल्याने सकाळपासुनच वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी सुरु झाली. वैद्यनाथ मंदिराच्या पायर्यावर लोखंडी बॅरिकेट्स मधुन भाविक धर्म दर्शनासाठी रांगेत होते. व पासधारकांची स्वतंत्र रांग होती. महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश, तेलंगणा, ओरिसा, मध्यप्रदेश व इतर राज्यातुन भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत. ओरिसा राज्यातुन येथुन बारा भक्त वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले होते.
राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यनाथ मंदिर जवळील श्री विश्वेश्वर मंंडपात 11 ऑगस्ट पासुन सुरु झाले आहे. हे अनुष्ठान 2 सप्टेंबर चालणार आहे. अनुष्ठान मंडपात सकाळी 8 ते 11 परमरहस्य पारायण, 12 वाजता महिला भजनी मंडळाचे भजन 1 ते 3 गाथा भजन, 3 ते 4 प्रवचन, 4 ते 6 व्याख्यान, रात्री 8 ते 10 किर्तना नंतर शिवजागर होत आहे.
अनुष्ठान मंडपात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे दररोज सकाळी 11 वाजता व सायंकाळी 5 वाजता आरती नंतर दर्शनाची सोय करण्यात आली आहे. महाराजांच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची रिघ लागत आहे. दररोज दर्शनासाठी येणार्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. वीरमठ संस्थान राजूर (अहमदपूर) येथील महिलांनी गुरुराज माऊलीच्या जय घोषात दिंडी काढली व ही दिंडी अनुष्ठान मंडपात पोहोंचली याठिकाणी समितीच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. तसेच विविध ठिकाणी हुन दिंड्या दाखल झाल्या होत्या. मंडपात महिला व पुरुष भक्तांनी फुगडी खेळली.
श्रावण सोमवार व तपोनुष्ठान सोहळा यामुळे वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजुन गेला आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व पोलिस प्रशासनाच्या वतीने श्रावणमहिन्यात सोमवार निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था व पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. महिला व पुरुषांची व पासधारकांची स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या श्रावण सोमवारी 1 लांखाच्या वर भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दुसर्या श्रावण सोमवारीही गर्दीत वाढ होईल अशी माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी लोकमतशी बोलतांना दिली.
श्रावण महिना असल्याने प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दर्शनासाठी व तपोनुष्ठान सेाहळ्यास उपस्थिती दर्शविण्यासाठी राज्य व परराज्यातुन भाविक येत आहेत. यापुढेही भाविकांची संख्या वाढेल त्यामुळे परळी शहर भक्तांच्या गर्दीने फुलत आहे. अनुष्ठान मंडपातील दिवसभरातील धार्मिक व आरोग्यविषयक कार्यक्रमास भाविकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे अनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे व कार्याध्यक्ष शाहुराव ढोबळे, उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर यांनी सांगितले.
***************
परळीत शिवाचे अस्तित्व आहे. अत्यंत जागृत असे वैद्यनाथाचे मंदिर आहे. पार्वतीसह वैद्यनाथ येथे असल्याने देशातील इतर ज्योतिर्लिंगा पेक्षा परळीच्या वैद्यनाथाचे विशेष महत्त्व आहे - राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर
************
परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे एकमेव असे ज्येातिर्लिंग आहे. जे पार्वतीसह आहे. वैद्यनाथाच्या मुख्य गाभार्याच्या महाद्वाराला अगदी लागुनच उजव्या कडच्या बाजुस पार्वती मातेची भव्य अशी मुर्ती आहे. वैद्यांचा वैद्य वैद्यनाथ असल्याने रोग मुक्त व शोक मुक्त करणारा परळीचा वैद्यनाथ आहे.
प.पू.स्वामी डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व युवा प्रचारक
************
परळी क्षेत्राचे महत्वाचे वैशिष्टये म्हणजे परळीला जवा आगळी काशी असे म्हणतात कारण परळी महात्म्यात सांगितल्याप्रमाणे परळीच्या रहिवाशांना यात्रा म्हणून काशीला जाणे व्रज मानले जाते. खरेतर काशीचे महत्व आणि वैशिष्टये आगळे आहे. परंतु यात्रा म्हणुन काशीला जाणे परळीला व्रज असा फार जुना संकेत येथे रुढ आहे. वैद्यनाथाने भक्तांसाठी मरण काळाची ही हुर हुर सुध्दा नाहीशी केली आहे. काशी पेक्षा एक जवभर पुण्य परळीला अधिक आहे.
- राजेश देशमुख
सेक्रेटरी ः श्री वैद्यनाथ देवस्थान कमिटी, परळी वैजनाथ
****************
कोण गिरस्त पुसतो । परळीची काय खूण ।
देव माझ्या वैजुबाच्या । शिखराला हाय सोनं ॥
परळी ग गावाीचा । वैजुबा ग देशमुख ।
रात्री न दीस वाहात । नहानीला गायमुख ॥
आठ दिसा सोमवारी । गंगा येतील परळीला ।
देवा माझ्या वैजुबाच्या । गोसायाच्या अंघुळीला ॥
परंपरेने चालत आलेल्या या ओव्या म्हणजेच चालते बोलते परळीचे लोकसाहित्य होय. असे प्रा.सौ.सुलभा देशपांडे यांनी परळी माहात्म्य या पुस्तकात म्हटले आहे.
*******×
वरूणराजाचीही हजेरी*
प्रभु वैद्यनाथच्या मंदिरात दुसऱ्या सोमवारी भाविकांची गर्दी होती. दुपारी संततधार वरूणराजानेही हजेरी लावीत भर पावसात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. छत्री घेऊन भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होती.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com