एसीबीची कारवाई; 10 हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहाथ...

पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट  2018


अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव सज्जाच्या महिला तलाठी धनश्री तुकाराम चव्हाण यांना 10 हजार  रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी अंबाजोगाई शहरात करण्यात आली.

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच चव्हाण यांनी मागितली होती. याबाबत तक्रारदाराने तात्काळ एसीबीकडे तक्रार केली. पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी तक्रारीची शहानिशा केली. 30 पैकी 10 हजार रुपये शुक्रवारी स्वीकारण्याचे ठरले. त्याप्रमाणे अंबाजोगाई शहरातील रिंगरोडवरील छत्रपतीनगरमध्ये चव्हाण यांच्या राहत्या घरी सापळा लावला. 10 हजार रुपये स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या अधिकाजयांनी झडप घालत चव्हाण यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पो. ह. दादासाहेब केदार, अशोक ठोकळ, पो. ना. विकास मुंडे, अमोल बागलाने, चालक सय्यद नदीम यांनी केली.




  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com