मंगळवेढ्यातील सचिन कलुबर्मे खूनप्रकरणात पोलीसांनी केली तीन वाहने जप्त.. पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमामधे वाढ!
पंढरपूर LIVE 4 मे 2018
मंगळवेढ्यातील सचिन कलुबर्मे खूनप्रकरणात पोलीसांनी केली तीन वाहने जप्त..
पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलमामधे वाढ!
मंगळवेढा(वार्ताहार)- सचिन कलुबर्मे खून प्रकरणात पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार, एक बोलेरो जीप व एक मोटार सायकल अशी तीन वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, आरोपी बाबासाहेब नाईकवाडी यांने रक्ताने माखलेला टी-शर्ट पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुलगुंजन तालुका जत येथे जाळून टाकल्याप्रकरणी भादविसं कलम 201 हे वाढविण्यात आले आहे.
सचिन कलुबर्मे याचा खून केल्यानंतर आरोपी बाबासाहेब नाईकवाडी हा खोमनाळ नाक्याजवळील एका दुकानाच्या आश्रयाला लपून बसला होता. तदनंतर त्याने आरोपी कराळे याला फोन करून एम.एच.13 सी.के.1769 ही स्विफ्ट कार मागवून घेतली. कराळे व आरोपी नाईकवाडी व त्याची लहान मुले असे गुंजेगाव तन्हाळी मार्गे पंढरपूरातील नातेवाईकांकडे गेले. नातेवाईकांनी नकार दिल्यानंतर ते पुन्हा मंगळवेढ्याकडे माघारी येवून पाठखळ येथे थांबले. यावेळी कराळे यांनी जतकडे स्विफ्ट कार घेवून जाण्यास नकार दिला. तद्नंतर अलीम पटेल याला फोन करून एम.एच.13 ए.झेड.8224 ही बोलोरो जीप मागवून घेतली व आरोपी गुंलगुंजन (ता.जत) येथील आरोपी बाबासाहेब नाईकवाडी याची मावस बहिणीकडे गेले तेथे त्याने रक्ताने माखलेला टी-शर्ट स्वयंपाक खोलीत असलेल्या चुलीत जाळला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या घटनेत आरोपींना पळून जाण्यास मदत केली व पोलीस प्रशासनास घटनेची माहिती देणे गरजेचे असताना ती माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनाजी कराळे वय 33 वर्षे व अलीम पटेल यांना पोलीसांनी अटक केली.व गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट कार तसेच बोलेरो जीप, आरोपींनी खून करण्यापूर्वी घटनास्थळी येताना एम.एच.13 सीजी.0801 ह्या फॅशन मोटारसायकलाचा वापर केल्याने एकंदरीत पोलीसांनी तीन वाहने या घटनेत जप्त केली आहेत. आरोपी बाबासाहेब नाईकवाडी यांच्याकडे पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता सचिन कलुबर्मे याचा खून करताना वापरलेले हत्यार एका पडक्या घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी आरोपीला घटनास्थळी नेल्यानंतर रक्ताचे डाग असलेले हत्यार काढून दिले. या खूनप्रकरणी दोन दिवसात एकूण पंधराजणांकडे कसून चौकशी करण्यात आली. पोलीस अधिक्षक श्री.एस. विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.सचिन हुंदळेकर व चार पोलीस कर्मचारी तर दुसर्या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री.दत्तात्रय पुजारी यांच्यासह चार पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. एक पथक गुरूवारी आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहे. लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com