सात गावांच्या समावेशाने आटपाडी नगरपालिकाच करा.... आ.जयंतराव पाटील यांना सादिक खाटीक यांचे साकडे

पंढरपूर LIVE 5 मे 2018 

   आटपाडी :- नगरपंचायत ऐवजी आटपाडीची नगरपालिकाच होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निर्णायक प्रयत्न व्हावेत, यासाठी राष्ट्रवादीचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा असे साकडे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी त्यांना घातले आहे. 

आटपाडी ग्रामपंचायत निवडणूकीची प्रक्रिया ही सुरु झालेली होती. ७ मे पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार होता. त्या पार्श्वभूमीवर आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याचा शासन निर्णय झाल्याचे ऐकून आश्चर्य वाटले. तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय सुमारे अडीच वर्षापूर्वीच झाला होता. त्यानुसार जिल्हयातील जत, कवठेमहंकाळ, खानापूर, शिराळा, पलूस, कडेगांव या ठिकाणच्या नगरपंचायती अस्तित्वात आल्या. परंतू आटपाडीकरांना नगरपंचायत नको असल्याने हा निर्णय अडीच वर्षे प्रलंबीत पडला होता. अशी वस्तुस्थिती असताना नगरपंचायत करण्याच्या झालेल्या निर्णयाने बहुतांश आटपाडीकरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याचे सादिक खाटीक यांनी निदर्शनास आणले आहे. 











आपली भूमिका विस्तृतपणे मांडताना सादिक खाटीक यांनी, काल परवापर्यंत आटपाडी ग्रामपंचायतीची कार्यकक्षा १७ किलोमीटर लांबपर्यंत होती. एवढया लांब अंतरावरील शेंडगेवाडी, आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग होती. नगरपंचायतीच्या निर्णयाबरोबरच शेंडगेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण केली गेली आहे. तर पूर्वी ७ किलोमीटर अंतरावरील मुढेवाडी आणि ४ किलोमीटर परिघातील मापटेमळा, भिंगेवाडी, देशमुखवाडी, पुजारवाडी (आटपाडी), खानजोडवाडी, यमाजी पाटलाची वाडी (य.पा.वाडी) आणि मासाळवाडी या ७ वाडया स्वतंत्र ग्रामपंचायती होण्यापूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग होत्या. आटपाडी नगरपालीका करताना या ७ वाडयांचा समावेश करुन सशक्त नगरपालीका केली जावी, ही मागणी गेली अडीच वर्षे सातत्याने केली जात आहे.  तथापी त्याकडे दुर्लक्ष करुन केवळ राजकीय कुरघोडयातून अडीच वर्षे निर्णय प्रलंबीत ठेवून, केला गेलेला नगरपंचायतीचा निर्णय जनविरोधी आहे. आटपाडी शहराच्या गतीमान, चौफेर आणि दिशादर्शक विकासासाठी आटपाडी नगरपालीका होणे गरजेचे असल्याचे  सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड नगरपालीकांचा विरोध मोडून काढून तत्कालीन मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या इच्छेखातीर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यानी सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालीका निर्माण केली. विशेष म्हणजे मिरजेचे माजी आमदार प्रा. शरद पाटील सरांच्या अथक प्रयत्नातून साकारल्या गेलेल्या कुपवाड नगरपालीकेवर सहा महिन्याच्या आतच वरवंटा फिरवीला गेला. नगरपालीका, महानगरपालीका अथवा एखादी महत्वपूर्ण बाब अस्तित्वात आणताना त्या, त्या गावांचा पाठींबा असो अथवा नसो, नगरपालीका, महानगरपालीका निर्मितीसाठी किती लोकसंख्या, मतदान लागते तेवढया प्रमाणात त्या, त्या गावांचा समावेश करुन नवनिर्मिती केली जाते, हे सर्वश्रुत आहे. आणि असे असताना आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपालीका करतानाच आमक्या गावांचा ठराव पाहीजे, तमक्या गावांचा विरोध नको ,अशा पालुपदाच्या आडून आटपाडीकरांच्या भावनेचा आणि मागणीचा गळा घोटत नगरपंचायतीचा घाट घातला गेला असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले आहे. 
आटपाडी-बेंगलोर या लांब पल्याच्या शिवशाही बस चालू करा ही मागणी जोर करत असतानाच, तांत्रीक कारणाने अडगळीत धुळ खात पडलेला * विटा- मेंगलोर * च्या प्रस्तावाला वर काढीत* विटा-बेंगलोर* गाडी सुरु करुन आटपाडीकरांच्या मागणीला तिलांजली देणा-या खानापूरकरांनी आटपाडी विषयीचे खास प्रेम दाखवून दिले होते, याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी, स्वतंत्र आटपाडी तालुका, स्वतंत्र मार्केट कमेटी, स्वतंत्र एस.टी. डेपो किंवा आटपाडी - मुंबई या प्रथम सुरु केलेल्या एस.टी. बसच्या वेळी केले गेलेले विरोधाचे नाटय, हे पाहता  सातत्याने आटपाडी तालुका वाशीयां विषयी असलेले खानापूरकर नेत्यांचे प्रेम वेळोवेळी दिसून आलेले आहे. वास्तवीक आटपाडी किंवा तालुक्याविषयी आस्थेने पाहीले जाणे गरजेचे असताना आपल्या समर्थकांना सुरक्षित ठेवून विरोधकांची पदे घालवण्यासाठीच नगरपंचायतीचाच घाट घातला गेल्याची भावना आटपाडीकरांमध्ये वाढीस लागली आहे. आटपाडी जवळील साखर कारखाना, सुतगिरणी, दूध संघ व अन्य महत्वाचे प्रकल्प इत्यादींचा नव्या नगरपालीकेच्या कार्यक्षेत्रात समावेश होणार असल्याने नव्याने अस्तित्वात येणारी आटपाडी नगरपालीका प्रारंभापासूनच सक्षम होवू शकते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आटपाडी नगरपालिकाच होण्यासाठी निर्णायक प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षाही आमदार जयंतराव पाटील साहेबांकडे सादिक खाटीक यांनी केली आहे.




महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com