पंढरीतील हाॅटेल धनश्री लाॅज येथील ग्राहकाची 65 हजाराची चोरी करणारे मोहोळ तालुक्यातील दोन चोरटे गजाआड! पो.उप.नि. हणुमंत देशमुख यांची कामगिरी!
पंढरपूर LIVE 4 मे 2018
पंढरीतील हाॅटेल धनश्री लाॅज येथील ग्राहकाची 65 हजाराची चोरी करणारे मोहोळ तालुक्यातील दोन चोरटे गजाआड!
पो.उप.नि. हणुमंत देशमुख यांची कामगिरी!
मार्च महिन्यात पंढरीतील हाॅटेल धनश्री लाॅज येथे मुक्कामास असलेल्या सांगली जिल्ह्यातील एका इसमाची मुद्देमालासह तब्बल 65 हजाराची चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे सहा. पो. उप निरीक्षक हणुमंत देशमुख यांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत देशमुख यांनी पंढरपूर लाईव्ह ला दिलेल्या माहितीनुसार दि. 16 मार्च 2018 रोजी वरील ठिकाणच्या लाॅजमधील एका रूममध्ये सुनिल हिरालाल बंडरे (35), रा. धामणी, जि. सांगली हे मुक्कामी असताना रात्री 11 ते पहाटे साडेपाच च्या दरम्यान ते झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून रूममध्ये प्रवेश करत 1 लॅपटॉप, 1 आय पाॅड व 2 मोबाईल तसेच रोख 10 हजार रू. असा रोख रक्कमेसह तब्बल 65 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल चोरी केला होता.
याबाबत बंडरे यांनी गुन्ह्याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तपासाधिकारी पो.उप.नि. हणुमंत देशमुख यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून आज या गुन्ह्यातील संशयीत आरोपी बंदेनवाज उर्फ बंड्या मधुकर पवार (19) रा. ढोकबाभुळगाव, ता. मोहोळ व उमेश प्रकाश काळे (25) रा. मलीकपेठ, ता. मोहोळ या दोघांना अटक केली असून. यांनी गुन्हयाची कबुली दिली आहे. आरोपींकडून लॅपटॉप व मोबाईल ताब्यात घेतले आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com