मंत्रिमंडळ निर्णय : एकूण - ३ दि. 3 मे 2018

पंढरपूर LIVE 3 मे 2018


मागास प्रवर्ग-ईबीसी विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय

राज्यातील विविध महाविद्यालये-शैक्षणिक संस्थांमध्ये 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची (शिक्षण शुल्कपरीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता) प्रलंबित रक्कम वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या रक्कमेतील निर्वाह भत्त्याची रक्कम पात्र विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर तर शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची रक्कम संबंधित महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेला ऑफलाईन पद्धतीने वितरित केली जाणार आहे.
मागासप्रवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षण व परीक्षा शुल्काची रक्कम प्राप्त होऊ न शकलेल्या महाविद्यालय-शैक्षणिक संस्थांना केवळ 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी काही अटी व शर्तींवर प्रलंबित रक्कम देण्यात येणार आहे. महाविद्यालयांकडील प्रवेशित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांपैकी आजअखेर लाभ देण्यात आलेले विद्यार्थी वगळून उर्वरित विद्यार्थ्यांच्या पात्र अभ्यासक्रमांसाठी देय होणारी रक्कम चार आठवड्यात दिली जाईल.
-----०-----

.............................
















महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com


अध्यादेश काढण्यास मान्यता
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला
कवयित्री बहिणाबाईंचे नाव

            जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्या‍पीठाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार याबाबतचा अध्यादेश काढण्यासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार करून या विद्यापीठास थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावेअशी मागणी विविध संघटनालोकप्रतिनिधी व मान्यवरांनी शासनाकडे केली होती. लोकभावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी 22 मार्च 2018 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा केली होती. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामविस्ताराचा अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली. या अध्यादेशानुसार हे विद्यापीठ येत्या 11 ऑगस्ट या बहिणाबाईंच्या जन्मदिनापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजळगाव या नव्या नावाने ओळखले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ मधील अनुसूचीच्या भाग- मधील अनुक्रमांक 8 मध्ये तशी सुधारणा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाचा नामविस्तार करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-2016 मध्ये दुरुस्ती करण्यासाठी विधानमंडळासमोर सादर करावयाच्या अध्यादेशाच्या मसुद्यासही मान्यता देण्यात आली.
-----०-----

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com




उच्च न्यायालयातील कक्ष अधिकाऱ्यांना
मंत्रालयीन संवर्गाप्रमाणे वेतन मिळणार

मुंबई उच्च न्यायालय आणि या न्यायालयाच्या नागपूरऔरंगाबाद आणि पणजी येथील खंडपीठातील कक्ष अधिकाऱ्यांना मंत्रालयातील कक्ष अधिकाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही वेतनश्रेणी 1 जानेवारी 2006 पासून मंजूर करण्यात आली असून तिचे प्रत्यक्ष लाभ 1 फेब्रुवारी2013 पासून देण्यात येणार आहेत.
मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकाऱ्यांना 9300-34800 अधिक ग्रेड वेतन 4400 तसेच चार वर्षानंतरच्या नियमित सेवेनंतर 9300-34800 अधिक ग्रेड वेतन 5400 याप्रमाणे वेतनश्रेणी देण्यात येत होती. मात्र, 11 फेब्रुवारी2013 च्या शासन निर्णयानुसार या कक्ष अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2006 पासून 9300-34800 अधिक ग्रेड वेतन 4800आणि चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर 15600-39100 अधिक ग्रेड वेतन 5400 ही सुधारित वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली होती. हीच वेतनश्रेणी उच्च न्यायालयातील कक्ष अधिकाऱ्यांना लागू करण्याची मागणी होती. त्यानुसार कार्यरत व सेवानिवृत्त कक्ष अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2013 पर्यंतच्या कालावधीत काल्पनिक वेतनवाढ मंजूर करण्यात येणार आहे तर 1 फेब्रुवारी 2013 पासूनचे लाभ प्रत्यक्ष देण्यात येणार आहेत. परंतु, 1 जानेवारी 2006 ते1 जानेवारी 2013 पर्यंतचे वेतन आणि भत्त्यांची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही. उच्च न्यायालयाच्या पणजी येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 1 जानेवारी 2014 पासून गोवा नागरी सेवा कायदा लागू झाल्याने तेथील कक्ष अधिकाऱ्यांना 31 डिसेंबर 2013 पर्यंतच लाभ देण्यात येतील.
-----०-----

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

वृ.वि.1958                                                                               13 वैशाख, 1939 (दु. 1.30 वा.)
                                                                                                दि. मे 2018
मुख्य माहिती आयुक्त पदाची
सुमित मल्लिक यांनी घेतली शपथ
मुंबईदि. 3 : राज्य मुख्य माहिती आयुक्तपदाची सुमित मल्लिक यांनी आज शपथ घेतली. लोकायुक्त म.अ.टहलियानी यांनी श्री. मल्लिक यांना पदाची शपथ दिली. त्यानंतर श्री. मल्लिक यांनी प्रभारी मुख्य माहिती आयुक्त ए. के. जैन यांच्याकडून सूत्रे स्विकारली.
यावेळी मुख्य सचिव डी. के. जैनवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदानसामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे यांच्यासह विविध विभागाचे माहिती आयुक्त यावेळी उपस्थित होते.
०००

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com


नंदकुमार वाघमारे/विसंअ/3.5.2018


वृ.वि.1959                                                                               13 वैशाख, 1939 (दु. 2.30 वा.)
                                                                                                दि. मे 2018
सर्व जंगले प्रदुषणमुक्त करा
100 गावांच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करा
- सुधीर मुनगंटीवार
             मुंबई दि. 3 : जंगलांमध्ये बॅट्री ऑपरेटेड किंवा इलेक्ट्रीक वाहनांची सुविधा टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून देऊन राज्यातील सर्व जंगले प्रदुषणमुक्त करात्यासाठी योजना तयार करा अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या व्याघ्र  संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेआमदार पंकज भोयर यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जंगलामध्ये प्लास्टिककुऱ्हाड बंदीची अंमलबजावणी कडक करावी तसेच हरित उर्जा संवर्धनाला गती द्यावी असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले कीव्याघ्र प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व वन कर्मचाऱ्यांना विशेषत: गाईडस् ना हॉस्पीटॅलिटी चे प्रशिक्षण देण्यात यावे. गाईडस् कडून पर्यटकांना देण्यात येणाऱ्या व्याघ्र प्रकल्पाच्या माहिती मध्ये एकसमानता असावी. वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना उत्तम वागणूक दिली जावी. व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात एकसमानता असावी. व्याघ्र पर्यटन करून परतलेल्या पर्यटकांना त्यांचा निसर्गानुभव किंवा सूचना देता याव्यात यासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर एक सूचना किंवा तक्रार पेटी ठेवण्यात यावीअसेही त्यांनी सांगितले.
व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक परिस्थिती जपून पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा कशा देता येतील यासाठी वनाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे सांगून मंत्री महोदय पुढे म्हणाले कीवनातील कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावली जावी. जंगलातील इको सिस्टीम योग्य पद्धतीने कार्यान्वित राहण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या केल्या जाव्यात.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात किंवा वनालगत राहणाऱ्या लोकांकडून खऱ्या अर्थाने वनांचे आणि जंगलांचे रक्षण आणि संवर्धन झाले आहे. त्यामुळे वनांचे ते खरे मालक आहेत. त्या गावकऱ्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे वनाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावे रोजगारयुक्तप्रदुषणमुक्तकुऱ्हाडमुक्त,व्यसनमुक्त आणि जलयुक्त करावेतत्या गावांचा सर्वांगीण विकास करावा. पहिल्या टप्प्यात अशी १०० गावे निवडून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार करावा. व्याघ्र प्रकल्पातील गावेतेथील लोकसंख्यायुवक-युवतीमहिला, त्यांचे शिक्षण यासारखी मुलभूत माहिती संकलित करून त्यांच्या विकासासाठी कौशल्य विकासाचा एक प्लान तयार करावा,मोठ्या कंपन्यांशी यासाठी टायअप करण्यात यावे. वन अतिथी संकल्पनेवर पुन्हा काम सुरु करावे,  जे पर्यटक व्याघ्र प्रकल्पातील बूकिंग कॅन्सल करतील त्यांचे बुकिंगचे पैसे निकषानुसार वेळेत परत करावेतअश सूचना ही त्यांनी यावेळी दिली.
व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये महिला बचतगटांच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात संघटित झाल्या असून विविध स्वंयरोजगारात गुंतल्या आहेत. या महिलांना एकत्रित येऊन काम करण्यासाठी बांबूचे एक चांगले डिझाईन विकसित करून त्यांना शेड उपलब्ध करून द्यावेजुन्या तसेच विस्तारित उज्वला  योजनेची सांगड घालून बफरक्षेत्रातील गावांमधील १०० टक्के कुटुंबांना गॅस जोडणी देतांना गाव हे घटक मानून एकेक गाव पूर्णत्वाला न्यावे असेही ते म्हणाले.
कालच्या बैठकीत ताडोबा-अंधारीमेळघाटसह्याद्रीनवेगाव-नागझिराबोरपेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सन२०१८-१९ च्या अंदाजपत्रकास मंजूरी  देण्यात आली.  यामध्ये व्याघ्रप्रकल्पातील सोयी-सुविधा आणि खर्चाच्या अनुषंगाने अनेक महत्वपूर्ण निर्णयांना मान्यता देण्यात आली.
व्याघ्र प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यातील सर्व कामे दर्जात्मक होण्याची काळजी घेण्याचे तसेच मंजूर निधी१०० टक्के खर्च होईल याकडे लक्ष देण्याची सूचना वन विभागाचे सचिव श्री. खारगे यांनी यावेळी दिली
००००

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

वृ.वि.1960                                                                               13 वैशाख, 1939 (दु. 3.30 वा.)
                                                                                                दि. मे 2018
आजची पिढी सुसंस्कारित व्हावी यासाठी
ग्रंथालयांनी दुवा म्हणून काम करणे आवश्यक
- विनोद तावडे
मुंबईदि. 3 : आजची आपली सर्वांची दैनंदिनी धावपळीची असते. त्यामध्ये सोशल मीडियाइंटरनेटगॅझेट,चॅनेल यामध्ये वाचकांना वाचनाशी जोडन ठेवणे आवश्यक आहे. वाचकांनी अधिकाधिक वाचावेपुस्तकांव्दारे आजची पिढी सुसंस्कारित व्हावी यासाठी येणाऱ्या काळात ग्रंथालयांनी दुवा म्हणून काम करणे आवश्यक आहे, असउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावड यांनी आज सांगितले.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्काराचे वितरण मुंबई विद्यापीठातील दिक्षांत सभागृहात आज आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी श्री. तावडे यांनी ग्रंथालय संचालनालयाचे महत्व विद केले. यावेळी ग्रंथालय संचालक किरण धांडोरेडॉ.रामेश्वर पवारउच्च  व तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे यावेळी म्हणालआजच्या तरुणांच्या ग्रंथालयाशी जोडन ठेवणे, ग्रंथालय सक्षम करणे ही महत्वाची गरज असून यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ग्रंथालयांचा दर्जावाढ करत असताना ग्रंथालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असण्याबरोबरच त्या ग्रंथालयात नेमके किती वाचक येतात यावर सुध्दा लक्ष देणे आवश्यक आहे.  ग्रंथालय संचालनालयामार्फत देण्यात येणारे पुरस्कार पुढील वर्षापासून त्याचवर्षी देण्यात येतील. आगामी काळात ग्रंथालयांनी वाचक ग्रंथालयात येण्यासाठी वेगवेगळे प्रयोग राबविणे आवश्यक आहे. आज जाहर झालेल्या सर्व पुरस्कारार्थींनी या पुढील काळातही वाचन चळवळ अबाधित ठेवण्यासाठी आणि ग्रंथालयाची संस्कृती टिकवन ठेवण्यासाठी काम करावे असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयातर्फे राज्यातील शासन मान्यता प्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावाअधिक सेवा देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथालये व ग्रंथालय चळवळीतील उत्कृष्ट कार्यकर्ते व सेवक यांना शासनातर्फे गौरविण्यात येते. सध्या राज्यात शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयांवर प्रतिवर्षी सुमारे 110 कोटी रुपये  परिरक्षण अनुदानावर खर्च होत असूनगाव तेथे ग्रंथालय’ निर्माण व्हावीतसमाजाच्या सर्व घटकांसाठी ग्रंथालयाचा लाभ व्हावा म्हणून कार्यान्वित ग्रंथालयांना प्रेरणा मिळावीअशी शासनाची भूमिका आहे. माहितीच्या युगात ती समर्थ ठरावीत्यांच्या सेवांमध्येविविधता येऊन त्यांचा दर्जा वाढावाग्रंथालये वाचकाभिमुख व्हावी. त्यांनी पारंपरिक स्वरुप बदलून त्यांनी नवन तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा.   यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट काम करणा-या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पुरस्कार देण्याची ही योजना सन 1984-85 पासून सुरु केलेली आहे. सुरुवातीस राज्यमधील अ,,क व ड वर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार ग्रंथालयांचीच पुरस्कारासाठी निवड करण्यात येत होती. सन1986-87 पासून या योजनेचा विस्तार करण्यात येऊन शहरी व ग्रामीण अशा दोन भागातील,,क आणि ड वर्गातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण आठ उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना पुरस्कार दिले जात आहेत. सन 2002-2003 या वर्षापासून शासनाने पुरस्काराच्या रकमेत भरीव वाढ केली आहे. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ,,आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना आता अनुक्रमे रु. 50 हजार, रु.30 हजाररु.20हजारव रु. 10 हजार असे रोख पारितोषिकसन्मानपत्र व स्मृतीचिन्ह समारंभापूर्वक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते.
             ग्रंथालय चळवळीच्या विकासासाठी योगदान देणा-या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये क्षेत्रातील कार्यकर्ते व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रवृत्त व्हावेत्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून भारताततील ग्रंथालय शास्त्राचे जनक   डॉ. एस. आर. रंगनाथन् यांच्या नावांने पुरस्कार देण्याची नाविन्यपूर्ण योजना सन 1994-95 पासून राज्यात नव्यानेच सुरु करण्यात येऊन राज्यस्तरावरुन प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना दिला जात होता. सन 2002-03 पासून सदरहू पुरस्कारांच्या संख्येत व पुरस्काराच्या रकमेत शासनाने भरीव वाढ केलेली आहे. त्यानुसार प्रस्तुत पुरस्कार राज्यस्तरावरील कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. 25,000 तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभाग स्तरावरुन एकेक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी रु. 15,000 स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते.
आज देण्यात आलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि
डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार सन 2014-15 व सन 2015-16
            महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावात्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार दिले जातात.
                           2014-15 साठी खालील प्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार सन 2014-15
शहरी विभाग
.क्र.
ग्रंथालयाचे नाव
दर्जा/वर्ग
पुरस्काराची रक्क्(रुपये)
1)
गणेश वाचनालयनानल पेठता.जिपरभणी
50,000/-
2)
सत्यशारदा सार्वजनिक वाचनालयता.जिपरभणी
30,000/-
3)
सहकार महर्षी माबाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय,कन्नड,जिऔरंगाबाद
20,000/-
4)
महेवी मुजफ्फर लायब्ररीमालेगाव तामालेगावजिनाशिक
10,000/-
ग्रामीण विभाग
.क्र.
ग्रंथालयाचे नाव
दर्जा/वर्ग
पुरस्काराची रक्क्(रुपये)
1)
रसिक रंजन वाचनालयघुणकीए ताहातकणंगलेजि.कोल्हापूर
50,000/-
2)
विदर्भ ग्रामीण विकास सार्वजनिक वाचनालय,भीमनगर,सावंगी (मेघे,) ता.जिवर्धा
30,000/-
3)
शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालयधावज्याची वाडी,ता.जिबीड
20,000/-
4)
गोदावरी सार्वजनिक वाचनालयनांदूर मधमेश्वरता.निफाड जिनाशिक.
10,000/-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार सन 2015-16
शहरी विभाग

.क्र.
ग्रंथालयाचे नाव
दर्जा/वर्ग

.............................














महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


  • Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368,  8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com