परदेशात दत्तक जाणा-या बालिकेचा दत्तक विधान सोहळा संपन्न

पंढरपूर LIVE 29 एप्रिल 2018


पंढरपूर दि. 29 :- अनाथ-निराधार बालकांचे संगोपन, शिक्षण व पुनर्वसन करणा-या नवरंगे बालकाश्रमात आश्रमकन्येला इटलीमधील दांपत्याला दत्तक देण्याचा  विधान सोहळा जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.
            अनाथलायातील बालकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर दत्तक देण्यासाठी जिल्हा न्यायालयात कायदेशीर प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर दत्तक विधान पुर्ण केले जाते.  प्रथम सेंट्रल ॲडॉप्शन को-ऑर्डिनेशन एजन्सी (C.A.R.A.)  तसेच इंडीयन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेयर, पुणे यांच्या अहवाला नुसार  इटलीत दापत्यांनी  या माध्यमातून समन्वय साधून बालकाचे दत्तक विधान  केले. ‘कारा’या संस्स्थेचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर. दत्तक विधान पुर्ण करण्यासाठी  जिल्हा न्यायाधिश पी.आर.देशमुख यांनी  सर्व कायदेशीर प्रक्रियेची खातर जमा करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर दत्तक विधानाला मंजूरी  दिली. तसेच  मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट व व्हिसा काढण्यासाठीही परवानगी दिली.
 जिल्हा न्यायाधिश पी.आर. देशमुख यांनी  नवरंगे बालक आश्रमातील 30 मुला-मुलींना देशातंर्गत व 9 मुला-मुलींना इटली, मलेशिया, सिंगापूर, अमेरीका, दुबई  इत्यादी देशात दत्तक देण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेची खातर जमा करुन आदेश काढले.
या दत्तक विधान सोहळ्यास अधिक्षिका राजश्री गाडे, कार्यकारी अधिकारी वासुदेव दर्शने, धर्मराज डफळे व सेवक वर्ग उपस्थित होते.








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com