विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन करावे – राज्यपाल राम नाईक
पंढरपूर LIVE 29 एप्रिल 2018
श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट च्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सल्ला
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन केले पाहिजे. धर्म म्हटलं की, हिंदू, मुस्लिम, इसाई, असे विचार न करता ‘कर्तव्य’ असा आहे. असे उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी श्री शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थेचे रौप्य महोत्सव वर्षाचा शुभारंभ आणि राष्ट्रीय मुल्यांकन परिषद बंगलोर यांनी महाविद्यालयास प्रदान केलेल्या “ए” श्रेणी प्रित्यर्थ सोहळा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सल्ला दिला.
राज्यपाल नाईक म्हणाले की, ग्रामपंचायत ते महानगरपालिका असे या शहराचा इतिहास आहे. अभिनंदन करतो की एक लहानसे रोप 25 वर्षापूर्वी रोपले होते, बघता बघता त्याचे महान वटवृक्ष झाले आहे. अशा वटवृक्षाच्या सावळीत 8500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे अद्वितीय कार्य आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थी धर्माचे पालन केले पाहिजे. धर्म म्हटलं की, हिंदू, मुस्लिम, इसाई, असे विचार न करता “कर्तव्य” असे आहे. जेव्हा मी विद्यार्थी धर्म म्हणतो याचा असा परिचय आहे की, ज्या प्रकारे विद्यार्थांकडून अपेक्षा असते त्या भूमिकेत विद्यार्थ्यांनी कार्य केले पाहिजे. विद्यार्थी धर्म चा पहिले कर्तव्य हे आहे की, त्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे, परिश्रमाने अभ्यास करावे. कठीण मेहनत घेऊन अभ्यास करावे, जे काही शिकवले जाते. त्या दृष्टीने परिश्रम करून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ज्ञान मिळते ते या प्रकारे संग्रहित करा की, आपल्या भविष्याच्या जीवनात उपयोग होईल असे आपण विद्यार्थी धर्माचे पालन केले पाहिजे. हे पालन करत असताना पुस्तकी किडा होऊ नका. असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच त्यांनी आपल्या ‘चरैवेति ! चरैवेति !!’ या पुस्तकाचा आधार घेत जो बसला आहे त्याचे भाग्य बसलेले असते, जो झोपला आहे त्याचे भाग्य पण झोपलेले असते, जो उभा राहिला त्याचे भाग्य पण उभे राहते, परंतु जो चालतो त्याचेच भाग्य चालते त्यामुळे विद्यार्थ्यांनो सूर्य प्रमाणे जीवनात चालत राहा असा जीवनाचा शाश्वत संदेश उत्तरप्रदेश चे राज्यपाल भाजपा ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी विद्यार्थ्यांना दिला. दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आजी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव “विनय” या पुस्तकाचे प्रकाशन व महाविद्यालयातील एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विक्रीकर निरीक्षक निविदिता पाटील, उत्कृष्ट गायन स्पर्धात प्रथम आलेल्या चंद्रीमा दत्त, जागतिक पातळीवर रांगोळी स्पर्धा करणारे जीवचंद्र येथील शैलेश पाटील, उत्कृष्ट लोकनृत्य करणारे जयेश पाटील अशा विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र राज्यपाल नाईक यांच्या शुभहस्ते देऊन करण्यात आला.
मिरा भाईंदर मनपा महापौर डिंपल मेहता यांनी संस्थेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले की, शैक्षणिक संस्था चालवणे खूप कठीण काम आहे कारण माझी शैक्षणिक संस्था आहे पण आम्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालवतो. यात जवाबदारी असते म्हणून महाविद्यालय सुरु करण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे या संस्थेचे मनापासून अभिनंदन करतो. आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, शिक्षण हे दिशा दर्शक आहे. ज्याप्रमाणे विधानपरिषदचे उपसभापती वसंत डावखरे यांनी जे प्रेम दिले तेच प्रेम मी हि देईल असे आश्वासन दिले. याच संस्थेच्या 50 वर्ष, 100 वर्षाच्या कार्यक्रमात मला आमंत्रित कराव अशी भावना व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष तथा मिरा भाईंदर मनपा सभागृह नेते रोहिदास पाटील संस्थेच्या संकटात आणि सुखात दोन ‘राम’ यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्दर्शन केले आहे असे सांगत स्व. खा. राम कापसे आणि राज्यपाल राम नाईक यांच्या सह मोरेश्वर पाटील, स्व. गोपीनाथ मुंडे, वसंत डावखरे, वसंत बापट, धर्मवीर आनंद दिघे, प्रकाश परांजपे आदी संदर्भात जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जो राज्यपाल होतो ती व्यक्ती राष्ट्रपती होते असे सांगत राम नाईक यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी निशिगंधा नाईक, रामब्रिज यादव, माजी महापौर गीता जैन, तत्कालीन आयुक्त शिवमूर्ती नाईक, आयुक्त बळीराम पवार, सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, प्राचार्या रंजना पाटील, श्रीपाद मोरे, प्रियांका पाटील, भूषण पाटील आदी नगरसेवक, नगरसेविका तथा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com