डॉ.द.ता.भोसले वाचनालयाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण
पंढरपूर LIVE 29 एप्रिल 2018
सर्वात जास्त श्रेष्ठत्व हे साहित्यात असतं- उल्हासदादा पवार
प्रतिनिधी/पंढरपूर
साहित्याचं श्रेष्ठत्व हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक श्रेष्ठ असतं, साहित्य समाजाला एक दिशा देण्याचं काम करत असतं,समाजात कोणताच घटक जबाबदारीने वागत नसताना जबाबदारीने वागण्याची सर्व भूमिका ही फक्त साहित्यिकांना घ्यावी लागते, साहित्यावरच समाजाचा सर्वात मोठा विश्वास असतो, साहित्य आपल्या जगण्याला एक नवीन बळ देत असतं, साहित्य आणि माणूस वेगळे करता येत नाहीत. साहित्यांमध्ये खचलेल्या, पिचलेल्या समाजाचे चित्रण यायलाच हवे, असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार यांनी केले, औचीत्य होते डॉ.द.ता.भोसले वाचनालयाच्या व जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे.
संत तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, या वेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांनी, 'मराठी साहित्याला खूप मोठी दिव्य परंपरा लाभलेली आहे, तुकोबाला सोडून मराठी साहित्य पूर्णच होवु शकत नाही, तुकोबा हा महाराष्ट्राचा समानार्थी शब्द आहे, संत ज्ञानेश्वर यांनी एक भिंत चालवली पण आपल्या खेड्यातली साधी मायमाऊली रोज चार भिंती चालवत असते. सर्वसामान्य महिला हीच सर्वात मोठी समीक्षक असते, साहित्यिकांनी पयरस्कारांच्या मागे लागण्यापेक्षा पुरस्कार आपल्या मागे लागतील एवढ्या ताकतीने व्यक्त होणे गरजेचे आहे,' असे मत व्यक्त केले.
सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष मा.कल्याणराव शिंदे यांनी केले, या वेळी व्यासपीठावर डॉ.द.ता.भोसले, भागवताचार्य वा.ना.उत्पात, नानासाहेब रत्नपारखी, आदी मान्यवर उपस्थित होते, यावेळी मरवडे गावचे छत्रपती परिवाराचे सुरेश पवार यांना साहित्यसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याबरोबरच ऋषिकेश गुप्ते यांच्या 'दंशवेल' या कादंबरीस, अशोक जाधव यांच्या ' भंगार' या आत्मकथनास, किरण येले यांच्या ' मोराची बायको' या कथासंग्रहास, अरुण इंगवले यांच्या ' अबुट घेऱ्यातील सूर्य' या कविता संग्रहास, व सौ.शोभा इंगवले यांच्या ' आधुनिक मराठी बालकविता' या समीक्षाग्रंथास, अशा एकूण पाच साहित्यकृतींना प्रत्येकी रोख रक्कम पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी निवड समितीमध्ये काम केल्याबद्दल डॉ.देवानंद सोनटक्के, डॉ.राजाराम राठोड, प्रा.धनाजी चव्हाण, प्रा.भास्कर बंगाळे आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऑड. भारत भोसले, बापू भोसले, गणेश गायकवाड, संभाजी आडगळे, राजेंद्र गिड्डे,सूर्याजी भोसले, यांनी कष्ट घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले, तर आभार प्रा.धनाजी चव्हाण यांनी मानले. या सोहळ्यास पंधरपूरातील व परिसरातील मोठ्या संख्येने साहित्यरसिक उपस्थितीत होते.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com