श्रमिक वृत्तपत्र संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन कोळी व उपाध्यक्षपदी संजय रोकडे यांची निवड

। पंढरपूर, प्रतिनिधी श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघाच्या वतीने कामगार दिनानिमित्त बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकिच्या अध्यक्षस्थानी संस्थापक शिवाजीराव शिंदे होते. यावेळी श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघाचे जिल्ह्यातील सदस्य उपस्थित होते. यावेळी मोहन कोळी (पटवर्धन कुरोली) यांची जिल्हाध्यक्षपदी तर संजय रोकडे (पिलीव ता. माळशिरस) यांची जिल्हाउपाध्यक्षपदी, सचिव अंकुश क्षीरसागर पंढरपूर, सहसचिव गुरूनाथ जमदाडे तावशी, खजिनदार लहु वसेकर टाकळी सिंकदर, सदस्य संतोष सोनार कटफळ, विष्णू गांडुळे बाभुळगांव, नाथा पिसे तावशी, शिवशंकर डमकले म्हसवड, उत्तम चौगुले सांगोला, नकाते जवळा, हरीभाऊ घोडके यांची निवड करण्यात आली. श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघ (रजि.) या संस्थेच्या ध्येयधोरणे व उद्ष्ट्यिे यावर चर्चा करण्यात आली. लवकरच जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना या संघामध्ये समावेश करून जिल्ह्यात मोठा मेळावा घेण्याचा मानस असल्याचे मोहन कोळी यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. सूत्रसंचालन गुरूनाथ जमदाडे यांनी तर आभार विष्णू गांडुळे यांनी मानले.