पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय जवान शहीद..
पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, दोन भारतीय जवान शहीद..
फाइल फोटो
जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले असून तीन जवान जखमी झाले आहेत. पाकिस्ताननं सकाळच्या दरम्यान गोळीबार केल्याची माहिती समजते आहे. दरम्यान, पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे.
या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. ज्यामध्ये एक जवना लष्कराचा आहे तर दुसरा जवान बीएसएफचा आहे. गोळीबारानंतर या परिसरातील बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला आहे.
Poonch ceasefire violation: Two Indian soldiers killed as Pakistan opens fire
Read @ANI_news story -> https://t.co/0KZYl1mIDbpic.twitter.com/YMtudwSPi0
— ANI Digital (@ani_digital) May 1, 2017
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं. सुरक्षा एजन्सीच्यानुसार, या परिसरात दहशतवाद्यांच्या काही टोळ्या दिसून आल्या आहेत. हे दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असू शकतात. त्यामुळेच पाकिस्तानकडून गोळीबार होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.