महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांना तुरीची भेट, राष्ट्रवादी आमदारांनी जाळला शेतकरी विरोधी जीआर
महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्यांना तुरीची भेट, राष्ट्रवादी आमदारांनी जाळला शेतकरी विरोधी जीआर
01 May.2017
आर्णी (यवतमाळ) -शासनाच्या चुकीच्या धोरना विरोधात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार ख्वाजा बेग यांनी महाराष्ट्र दिना निमीत्त यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तहसिदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुर भेट दिली आहे. तसेच आमदार बेग यांनी शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवणाऱ्या जीआरची होळी केली.
सोमवारी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. मात्र शेतकरी त्रस्त आहे, असे म्हणत आमदार बेग यांनी सरकारचा निषेध केला.