सोलापूर, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता....
सोलापूर, सातारा, सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता....
1 May. 2017
सातारा : अवकाळी पावसासंदर्भात ही आहे महत्त्वाची बातमी. सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्हासह विदर्भाच्या काही भागात पुढील २४ तासात वादळी वा-यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
दोन दिवस आधीच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात वादळी वा-यासह पाऊस झालाय..ज्याचा फटका पिकांना बसलाय ज्यामध्ये द्राक्षबागा आणि आंब्याचं नुकसान झालंय.
आता पुन्हा अवकाळी पाऊस झाला तर शेतकर्यासमोर मोठं संकट असणार आहे. तुर खरेदी केंद्रावरील तुर भिजण्याचाही धोका असल्यानं शेतकरी वर्ग धास्तावलाय.