ट्रिपल महाराष्ट्र केसरी चौधरी यांना अखेर सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी दिले नियुक्ती पत्र
ट्रिपल महाराष्ट्र केसरी चौधरी यांना अखेर सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी दिले नियुक्ती पत्र
03 May.2017
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हस्ते विजय चौधरींना नियुक्ती पत्र दिले.
मुंबई - तीनदा महाराष्ट्र केसरी ठरलेले पैलवान विजय चौधरी यांना अखेर राज्य सरकारने पोलीस उप महाधीक्षक पदी नियुक्ती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हस्ते विजय चौधरींना नियुक्ती पत्र दिले. तीन वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेले विजय चौधरी यांना लवकरच सरकारी नोकरी देणार असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिसेंबरमध्ये दिले होते. विधानसभेत विजय चौधरीचे अभिनंदन करताना दिलेले हे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी 4 महिन्यानंतर पूर्ण केले आहे.
विशेष म्हणजे, डिसेंबरमध्येच विजय चौधरींना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे, कुठल्याही शिफारशीशिवाय आठवड्याभरात विजय चौधरींना नोकरी मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र, अनेक महिने उलटूनही विजय चौधरींना सरकारी नोकरी मिळत नव्हती. मंत्रालयाच्या चकरा मारूनही त्यांच्या पदरी अपयश येत होते. त्याबद्दल त्यांनी खंत सुद्धा व्यक्त केली होती.