संतापजनक...पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना
पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना
1 May. 2017
भारतीय चौक्यांवर रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा केला.
Pakistan Army Mutilated Indian Jawan bodies : पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा भारताने दिला आहे.
जम्मू-काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून याबद्दलची माहिती प्रसिद्ध करण्यात आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या कृतीचा तीव्र निषेध केला असून याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाक सैन्याने सीमारेषेवरील भारतीय चौक्यांवर रॉकेट आणि उखळी तोफांचा मारा केला. भारतीय सैन्यानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी पाकिस्तानी सैन्याने लष्करी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले. त्यांनी गस्तीवर असलेल्या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली. पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याला योग्य ते प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आला आहे.