जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सेवा’ च्या वतीने पंढरीत विविध ठिकाणी वृक्षारोपण

पंढरपूर (प्रतिनिधी):-


दि. 5 जुन 2016 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सेवा’ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरपूर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पुन्हा सुस्थितीत आणण्यासाठी झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे हा एकमेव पर्याय सध्या जगासमोर आहे. याची जाण ठेवून कृतीशिल उपक्रमाच्या माध्यमातून ‘सेवा’ या पंढरीतील सामाजिक संस्थेच्या वतीने पंढरीतील शहर पोलिस स्टेशन, तालुका पोलिस स्टेशन आदींसह पंढरपूरच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

पंढरपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहराचा विस्तारही झपाट्याने झाला आहे. शहराच्या वातावरणाचे प्रदुषणातही तेवढीच अधिक वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील ओपन स्पेस, शासकीय कार्यालयांसोबतच प्रत्येक पंढरपूरकरांनी आपल्या घराच्या अंगणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे अत्यावश्यक आहे. याची जाण ठेवत ‘एक सुरुवात आमच्याकडून’ चा नारा देत पंढरपूरच्या ‘सेवा’ या सामाजिक संस्थेच्या वतीने आज दि. 5 जुन 2016 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर पोलिस ठाणे, पंढरपूर तालुका पोलिस ठाणे या कार्यालयात तसेच समता नगर, संतपेठ परिसर, लिंक रोड परिसर, नविन कोर्ट परिसर, इसबावी परिसर आदी भागातील कांही नागरिकांच्या घरासमोर तर कांही ओपन स्पेस मध्ये वृक्षारोपण केेले. यावेळी परिसरातील नागरिकांना वृक्षारोपणांसह त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे हे ‘सेवा’ या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पटवून देण्यात आले. यावेळी ‘सेवा’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश सिंघण (संचालक, खादी ग्रामोद्योग), सदस्य सचिन ताम्हाणे (पर्यावरण अधिकारी भीमा सह. सा.कारखाना), भगवान वानखेडे (उपाध्यक्ष, पंढरपूर पत्रकार संघ), श्रीकांत तोडकरी (कालवा निरीक्षक जलसंपदा विभाग उजनी), प्रतापसिंह देवकर (शेअर ब्रोकर), कैलास स्वामी (कर्जविभाग अधिकारी, मर्चन्ट बँक ), अ‍ॅड. सतीश झिरपे, राजु क्षिरसागर, अमित काकडे आदी पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे पोलिस निरीक्षक के. के. खराडे यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे पीएसआय गवळी, पीएसआय देशमुख व कर्मचारी उपस्थित होते.
पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे पीएसआय मारुती माने यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाहतुक शाखेचे पीएसआय निलेश गोपाळचावडीकर, पीएसआय रोहिदास गबाले, पीएसआय अनिल कदम, पोलिस हवालदार सुजीत उबाळे यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.
नविन कोर्ट परिसरात अ‍ॅड. सतीश झिरपे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गणेश व्यवहारे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

लिंक रोड परिसरात खादी भांडारचे अध्यक्ष नागेश सिंघण (सर) व तात्या पाचारणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राजु क्षिरसागर, अमित काकडे, रुद्रप्रतापसिंह सिंघण, मनस्वीणी सावंत, यशस्वीणी सावंत आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

इसबावी परिसरात सांगोला नगरपरिषदेचे कार्यालय निरीक्षक अभिजीत ताम्हाणे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहन परीक्षक श्रीकांत सरडे, चंद्रकांत सुळ आदी उपस्थित होते.
संतपेठ परिसरात श्रीमती नंदा वाघमारे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विकास वाघमारे, महेश दांडगे, महेश वाघमारे, सचिन गोडसे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.