भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल यांची दै.दामाजी एक्सप्रेस कार्यालयास सदिच्छा भेट

पंढरपूर (प्रतिनिधी):-
भारतीय जनता पार्टी चे नुतन पंढरपूर तालुकाध्यक्ष श्रीकांत पद्माकर बागल दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष दत्तासिंह रजपुत उपस्थित होते.