पंढरीच्या उपनगरातील पाणीप्रश्‍नी जनहित शेतकरी संघटनेचे उपोषण

पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरीतील संतपेठ, लक्ष्मी नगर, जुना कराड नाका, सुलेमान चाळ, कालिकादेवी चौक, कुंभार गल्ली, विस्थापित नगर व भक्तीमार्ग आदी उपनगरामधील पिण्याच्या पाणी प्रश्‍नाबाबत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 16 मे 2016 रोजी पंढरपूर नगरपरिषदेसमोर  उपोषण करण्यात आले.
वरील उपनगरामधीळ नळांना सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे, वृध्द महिलांचे जीवघेणे हाल होत आहेत. सध्या तीव्र ऊन्हाळा असून बोअरचे पाणीही आटले आहे. पाण्याअभावी सकाळचा स्वयंपाक दुपारी 1 वाजता होतो. लहान मुळे भुकेजलेली असतात त्यांचे अतोनात हाल होत आहेत. नोकरदारांना कामावर  वेळेत पोहचता येत नाही. नळाला पाणी येत नसल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई होत आहे. पंढरपूर
शहरातही ज्या ठिकाणी पाणी येते ते गढुळ येत आहे. नागरिकांना अशा पाण्यामुळे होणार्‍या रोगराईस नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनाच गृहीत धरण्यात येईल.

नगरपालिकेने या प्रश्‍नी त्वरीत लक्ष घालुन पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा आजच्या उपोषनाची दखल न घेतल्यास दि. 20 मे 2016 रोजी मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात दिवसभर केंव्हाही रिकामी मडकी ङ्गोड अंदोलन छेडणार असून लोकशाही मा र्गाने होणार्‍या या आंदोलनाच्या होणार्‍या परिणामास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल अशी माहिती जनहित चे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्ङ्ग दिनकर (भैय्या) देशमुख  यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकामध्ये दिली आहे.
नगरपालिकेच्या वतीने सदर संघटनेला दिलेल्या पत्र देऊन उपोषण मागे घेण्याविषयी विनंती करण्यात आली आहे. या पत्रामध्ये चार दिवसात या भागातील पाणीपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने करण्याची कार्यवाही करत आहोत. गढुळ पाणी न येणेबाबत योग्य ती दक्षता घेणेत येईल तरी आपण उपोषण मागे घ्यावे ही विनंती असे नमुद करण्यात आले आहे.

ङ्गोटो ओळ- महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने केलेल्या उपोषण आंदोलनाप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश (बापु) नवले, शहराध्यक्ष रणजित गळीतकर, तालुकाध्यक्ष सचिन आटकळे, संपर्क प्रमुख ज्ञानेश्‍वर भोसले, सौ.शोभा शिंदे, सौ.सारिका कांबळे, सौ.अंबिका गवळी, सौ.भागिरथी सगर, छावा संघटनेचे संतोष भोसले, शंकर सुरवसे आदी दिसत आहेत.