पंढरपूर बसस्थानकावर मंगळसुत्राची चोरी पोलिस गस्त वाढवा... प्रवाशांची मागणी!
पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरीतील नविन बसस्थानकावर एसटीत चढणार्या मंगळवेढा तालुक्यातील महिलेच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यातून समजलेले सविस्तर वृत्त असे की, दि. 17 मे 2016 रोजी दुपारी 12:15 वाजणेच्या सुमारास सलगर बु॥ ता. मंगळवेढा येथील शालन हणुमंत मुंढे या महिला प्रवाशी एसटी मध्ये चढताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र चोरुन नेले आहे. याबाबतची ङ्गिर्याद शालन हणुमंत मुंढे यांनी स्वत: शहर पोलिस ठाण्यात दिली असुन अधिक तपास पोलिस नाईक पवार हे करीत आहेत.

पंढरपूर शहरातील नविन बसस्थानकावर पोलिस गस्तीचे प्रमाण बसस्थानकाच्या आकाराच्या मानाने खुपच कमी आहे. गर्दीचा ङ्गायदा घेवुन चोर्या करणार्या भामट्यांची संख्या मात्र येथे दिवसेंदिवस वाढत आहे. यात्रा कालावधीत अशा भामट्यांचा उद्रेक अधिकच वाढलेला आढळतो. आज मंगळवार हा पंढरपूरचा आठवडा बाजार असल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढलेली होती. त्यातच आज मोहिनी एकादशी असलेमुळे विठ्ठल दर्शनासाठी बाहेरुन येणार्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. याचाच ङ्गायदा चोरट्यानी घेत चोरी केली असल्याची चर्चा बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये होताना आढळली. बसस्थानकावर पोलिसांची गस्त पुरेशी नसल्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढलेले असलेमुळे या घटनेनंतर बसस्थानकावरील पोलिसांच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी प्रवाशांतुन होत आहे.