तरुणाची प्रेयसीसह आत्महत्या
सोलापूर : घरच्यांनी प्रेमाला नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने मंगळवार, १७ मे रोजी पहाटे ५ वाजता आत्महत्या केल्याची घटना नई जिंदगी परिसरात घडली.
रमेश यलप्पा शिपरी (वय ३०, रा़ सिद्धेश्वरनगर-भाग ५, नई जिंदगी, सोलापूर) व दुर्गाव्वा दयामन्ना लळूडे (वय २५, रा़ आनंदनगर, हुबळी, राज्य- कर्नाटक) अशी प्रेमीयुगुलाची नावे आहेत़.
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश व दुर्गाव्वा या दोघांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते़ दुर्गाव्वा ही मूळची हुबळी शहरातील आनंदनगर भागात राहणारी आहे़. रमेश याच्यावर जिवापाड प्रेम असल्याने दुर्गाव्वा ही दर आठवड्याला दोन ते तीनदा खास रमेशला भेटायला येत होती़ हा प्रकार दुर्गाव्वा हिच्या आईला समजल्यानंतर आईने दुर्गाव्वाला त्या रमेशचा संसार उद्ध्वस्त करू नको, नीट वाग, असे समजावून सांगितले होते़. त्यावेळी दोघा मायलेकीमध्ये भांडण झाले होते़. या भांडणाच्या रागाने दुर्गाव्वा ही नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आली होती. प्रेमाला नकार दिल्याचा राग मनात धरून रमेश व दुर्गाव्वा या दोघांनी मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास पत्र्याच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
ही घटना उघडकीस येताच परिसरात राहणाºया नागरिकांनी या दोघांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी व एमआयडीसी पोलीस चौकीत करण्यात आली आहे़.
रमेश याला दोन बायका
आत्महत्या केलेल्या रमेश याला राधिका व रेणुका या दोन बायका आहेत़ दुर्गाव्वा ही रेणुका हिची सख्खी बहीण आहे़ म्हणजेच रमेशची मेहुणी़ रमेश हा मजुरी करीत होता़ मात्र दुर्गाव्वा हिच्याबरोबर प्रेम जडले होते़ मात्र प्रेमास नकार व आड येणाऱ्या घरच्यांना कंटाळून या दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली.