नागरीकांना देण्यात येणा-या आरोग्य विषयक सुविधांवर भर देण्यात येईल सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री डॉ. दिपक सांवत
पंढरपूर दि. 22- शासकीय रुग्णालयात नागरीकांना देण्यात येणा-या वैद्कीय सुविधांवर भर देण्याबरोबरच शासकीय रुग्णालयातील वैद्कीय अधिका-याची पदे भरण्यात येणार असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटूबं कल्याणमंत्री डॉ. दिपक सांवत यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात आरोग्य विषयक उद्भवणा-या समस्या सोडविण्यासाठी उपजिल्हा रुग्णलय पंढरपूर येथे आयोजित अधिकां-याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मलिक्कार्जून पट्टनशेट्टी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संजय देशमुख, प्र. वैद्यकीय अधिक्षक माया शेळके, डॉ.कुरुलकर, डॉ.आशा घोडके, डॉ.प्रविण केचे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ.सांवत म्हणाले की पंढरपूर हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने येणा-या भाविकांन बरोबरच नागरीकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकर भरली जातील. दररोज ओ.पी.डी.मध्ये येणारे रुग्ण, त्यांची तपासणी, औषधांचा पुरवठा, याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पट्टनशेट्टी यांनी दिली.
प्रारंभी डॉ. सावंत यांनी उपजिल्हा रुग्णलयातील नवजात शिशु विभाग, डायलेसिस, आपरेशन थिएटरला भेट देवून माहिती घेतली व संबधितांना आवश्यक त्या सुचना दिल्या. यावेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.