कोळी महादेव जमातीच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात 8 जोडपी विवाहबध्द


पंढरपूर - सालाबादप्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने कोळी महादेव जमातीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा दि.20 मे 2016 रोजी सायं.6.50 मिनिटांनी वाल्मिकी भवन खुले नाट्यगृह क्रांती चौक कोळे गल्ली, पंढरपूर येथे संपन्न झाला. भारतीय समाज जीवनामध्ये विवाह हा अत्यंत पवित्र असा संस्कार मानला जातो. परंतू सध्या विवाह म्हणजे जीवघेणा हुंडा मानापमान व पैशाची उधळपट्ट्ी होत असते. परंतू सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाने ग्रासलेला आहे. या परिस्थितीमध्ये मुला-मुलींचे लग्न करणे हे आईवडिलांना आर्थिकदृष्ट्या खूपच कठ्ीण होत आहे. ही समाजाची गरज ओळखून समाजातील होतकरू तरूण मंडळ महर्षी वाल्मिकी संघ यांचे मार्ङ्गत सामुदायिक विवाह सोहळा ही संकल्पना राबवित आहेत. यात विवाहामध्ये हुंडा देणे घेणे, अनावश्यक खर्च या गोष्ट्ींना ङ्गाटा देवून 8 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा सामुदायिकरित्या पार पाडण्यात आला.

महर्षि वाल्मिकी संघातर्ङ्गे विवाहाच्यावेळी वधूस शालू,हळदीची साडी, मणीमंगळसूत्र, जोडवे, बिचव्या, मुंडावळ्या,हारतुरे व वरासाठी सङ्गारी मुंडावळ्या, हारतुरे देण्यात आले व भोजन तसेच नवदांपत्यासाठी संसार उपयोगी भांडी देण्यात आली. यावेळीस वधुवरांची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.

अशी माहिती संस्थापक कार्याध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली. या विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शरद बनसोडे, आमदार भारतनाना भालके, साईनाथभाऊ अभंगराव, बाबासाहेब अधटराव, धनंजयनाना कोताळकर, प्रभाकरभैय्या देशमुख, लक्ष्मण शिरसट, अनिल अभंगराव, सुधीर अभंगराव, बाळासाहेब नेहतराव, श्रीकांत कोताळकर, राजाभाऊ अंकुशराव, लक्ष्मण धनवडे, सुरेश नेहतराव, गणेश कोळी, मोहन सावतराव, उत्तम परचंडे, मारूती संगीतराव, विक्रम शिरसट, सुभाष अधटराव, नागेश आंबेकर, समाजातील सर्व संघट्नांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ज्येष्ठ् नागरिक आदि उपस्थित होते.

हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठ्ी हणमंत कोरेे, जयवंत अभंगराव, बबलू बोराळकर, संतोष संगीतराव, निलेश माने,महावीर अभंगराव, विकी अभंगराव, प्रकाश मगर, विकी
संगीतराव, सुदाम होनकोंबडे, वैभव कांबळे, संपत सर्जे, संकेत परचंडे शिवराज भैय्या ननवरे, आप्पा करकंबकर, सुरज कांबळे, अक्षय म्हेत्रे, गणेश कडलासकर,श्रीकांत बळवंतकर, अक्षय रमगणावर, सत्यम दिक्षीत, विजय नेहतराव, कन्हैय्या माने, गणेश तारापूरकर, अनिल अधटराव आदिंनी परिश्रम घेतले.