प्रांताधिकारी तेली यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न
पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.
पंढरपूर रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय ध्वजारोहण समारंभात पोलीस, गृहरक्षक दल, एन.सी. सी., स्काऊट आणि विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या 35 पथकांनी सहभाग घेतला. प्रांताधिकारी तेली यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना स्विकारली.
याप्रसंगी विधान परिषदेच आ. प्रशांत परिचारक, आ.भारत भालके, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार नागेश पाटील, नायब तहसिलदार सीमा सोनवणे, पंढरपूर शहरचे पोलीस निरिक्षक किशारे नावंदे यांच्यासह स्वांतत्र्यसैनिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, नागरीक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उप विभागीय अधिकारी श्री. तेली यांच्या हस्ते संचलनामध्ये सहभागी झालेल्या पथकातील मुलांना प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले.