*कोल्हापूर येथे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे महाअधिवेशन
। कोल्हापूर/पंढरपूर, प्रतिनिधी
वृत्तपत्र विक्रेता हा असंघटीत कामगार वर्गामध्ये येणारा घटक असून महाराष्ट्र राज्यामध्ये 4 कोटीहून अधिक कामगार हे असंघटीत आहेत. या असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार असून 9 ङ्गेब्रुवारी रोजी
मंत्रालयात कामगार मंत्री, अधिकारी व विक्रेता संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेवून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही राज्याचे बांधकाम व सहकारमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटने महाअधिवेशन कोल्हापूर येथील आर्यविन मल्टीपर्पज हॉल, शाहुपुरी याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटना कोल्हापूर व जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन, सर्व डेपो यांच्यावतीने या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रारंभी हुतात्मा स्तंभ येथून रॅली काढण्यात आली. यामध्ये विक्रेत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध घोषणा देत ही रॅली कार्यक्रमस्थळी आली. अधिवेशनानिमित्त शाहिर दिलीप सावंत व कलावंतांचा शाहिर पोवाड्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी गणेश वंदना, गर्जा महाराष्ट्र माझा या गितांसह विक्रेत्यांच्या अडचणी व समस्या मांडणारे पोवाडे सादर करून उपस्थितांची मनमुराद दाद मिळविली.
महाअधिवेशनाचे उद्घाटन कोल्हापूर मनपाच्या महापौर आश्विनी रामाणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिवंगत नेते मंडळी व मयत झालेल्या विक्रेत्यांना श्रध्दांजली वाहन्यात आली. याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व राज्य सल्लागार शिवगोंड खोत, विभागीय उपाध्यक्ष विकास सुर्यवंशी, विभागीय सचिव रघुनाथ कांबळे, राज्य संघटक आण्णा गुंडे, सल्लागार भाऊ सुर्यवंशी, आण्णा पोतार, राज्याचे खजिनदार गोरख भिलारे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष किरण व्हणगुत्ते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रामाणे म्हणाल्या, ऊन, वारा, पाऊस या संकटांचा समाना करत पेपर वाटपाचे काम विक्रेत्यांना करावे लागते. मनपाच्या माध्यमातून कोल्हापूरातील विक्रेत्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटीबध्द आहोत. तसेच शहरातील पेपर स्टॉल व विक्रेता भवनासाठी प्रयत्न करणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम हे अत्यंत खडतर आहे. ऊन, वारा, पाऊस या संकटांचा सामना करत त्यांना पहाटेपासून हे काम करावे लागते. परंतू अद्यापपर्यंत विक्रेता हा घटक असंघटीत वर्गात मोडला जातो. संपूर्ण राज्यात सुमारे 4 कोटी असंघटीत कामगार आहेत. त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेणार असून 9 ङ्गेब्रुवारी रोजी मंत्रालयात कामगार मंत्री प्रकाश मेहता तसेच कामगार विभागाचे अधिकारी व विक्रेता संघटनेच्या पदाधिकार्यांची बैठक घेवून हा प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले.
संघटनेचे विभागीय सचिव रघुनाथ कांबळे यांनी मान्यवर व उपस्थितांचे स्वागत केले. संपूर्ण राज्यात सुमारे 3 लाख वृत्तपत्र विक्रेते असल्याचे सांगून कोल्हापूर येथील महाअधिवेशनाच्या आयोजनाची भूमिका, चळवळीचा इतिहास, विक्रेत्यांच्या समस्या व प्रश्नांची माहिती दिली. कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर यांनी, राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अनेक समस्या
असून याकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष केले जात आहे. शासन दरबारी व मालकांकडे विक्रेत्यांची कोणतीही नोंद नाही. वृत्तपत्र विक्रेत्यांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. त्यासाठी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन होणे गरजेचे आहे.
सहकार मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी याकडे लक्ष देवून शासन दरबारी मांडल्यास विक्रेत्यांना ङ्गअच्छे दिनफ येण्यास वेळ लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी विभागीय पदाधिकार्यांना कल्याणकारी मंडळाच्या माहितीपत्राचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी जेष्ठ विक्रेते आण्णा पोतदार व भाऊ सुर्यवंशी यांचा विशेष सत्कार महापौर आश्विनी रामाणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले अॅड.सी.बी. कोरे यांचा सत्कार ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शासनाने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून विक्रेत्यांना हक्काची जागा मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच अधिवेशनानिमित्त काढण्यात आलेल्या भूमीभूषण विशेषांकाचे प्रकाशन ना. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अर्जुन सेन गुप्ता यांनी असंघटीत क्षेत्रातील कामगारांकरीता केलेल्या शिङ्गारशींची अंमलबजावणी करावी, वृत्तपत्र विक्रेत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, संघटनेच्या पदाधिकार्यांना एस.टी. प्रवासात सवलत मिळावी तसेच शासकीय विश्रामगृहात निवासाची सोय व्हावी, गटई
कामगारांप्रमाणे अल्प किंमतीत वृत्तपत्र विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, विक्रेत्यांचे स्टॉल अतिक्रमणामध्ये धरू नये, स्टॉल हटविण्यापूर्वी सोईची जागा उपलब्ध करून द्यावी, प्रत्येक जिल्ह्याच्या, तालुक्याच्या ठिकाणी वृत्तपत्रांचे एकत्रितपणे वितरण करण्यासाठी विक्रेता भवन उभा करावे, वयोवृध्द विक्रेत्यांसाठी निवृत्ती वेतन सुरु करावे, शासकीय परिसर, एस.टी. व रेल्वे बुक स्टॉलसाठी संघटनेच्या
शिङ्गारशींचा विचार करावा, शासकीय घरकुल योजनेत वृत्तपत्र विक्रेत्यांना राखीव कोठा मिळावा आदी मागण्या संघटेनेच्यावतीने या अधिवेशनाद्वारे शासनाकडे करण्यात आल्या आहेत. सदर अधिवेशनास संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून हजारोंच्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.