सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार -छञपती संभाजी
शिवछावा-क्षात्रविर छत्रपती संभाजी राजे यांचे जयंती निमित्त...
पंढरपूर लाईव्ह च्या वतीने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
तसेच राजांना मानाचा मुजरा...!-संपादक
सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार -छञपती संभाजी
!! यशाचा नवा मंञ !! *शिवतंञ*
व्याख्याते, गीतकार, लेखक दत्ता सोनवणे देशमुख लिखित लेखमाला भाग २२
निधड्या छातीवरी झेलुनी यवनांचे वार एकच झाला जगती केले
शिवस्वप्न साकार छञपती
संभाजी भासे शिवबाची तलवार सळसळत्या रक्ताचा हा
धगधगता अंगार संभाजी म्हणजे शिवाजी नावाच्या परीस स्पशार्ने पावन झालेला एक आदर्श.ज्वलज्वलनतेजस शिवसुर्य युवायोद्धा ,किर्तीमान राजा , कोमलहृदयी हृदयस्पर्शी सम्राट , मृत्यूवर जय मिळवणारा मृत्यूंजय, पराक्रमाचा विक्रमादित्य, िनधड्याछातीचा ,पौलादीबाहुंचा, संस्कृतचापंडीत ,
संस्कृतीचा पाठीराखा, शुरवीर ,धर्मवीर ,कर्मवीर , ज्ञानवीर असा हा
संभाजीराजा.....
पण ३५०वषार्पासून शांत आहे रायगड ....
स्तब्ध आहे सह्याद्री...
आणि गाढ झोपलाय माझा महाराष्ट्र....!
म्हणूनच ...
हे महाराष्ट्रा जागा हो सह्याद्री जागा हो... रायगडा जागा हो आणि सांग ओरडून सगळ्या जगाला कसा होता माझा शंभूराजा िसंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा शंभूराजा बळीराजाचा अवतार म्हणजे शभूराजा शहाजीराजांच स्वप्न म्हणजे शंभूराजा िजजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा िशवरायांची तळपती तलवार म्हणजे शंभूराजा सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा...
१४मे१६५७ला पुरंदरावर एका युगंधराच्यापोटी जन्माला आलेला रणधुरंधर म्हणजे संभाजी वयाच्या दुसऱ्या वर्षीआई विना पोरका झालेला संभाजीराजा...
वयाच्या सातव्या वर्षी ४हजाराची मनसबदारी स्विकारणारा शंभूराजा वयाच्या आठव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शंभूराजा... वयाच्या दहाव्या वर्षी पाचहजारांची मनसब स्विकारणारा शंभूराजा...
१३व्या वर्षी रायप्पा महाराचा भरदरबारात सत्कार करणारा शंभूराजा... १४व्या वर्षी बुधभुषण हा संस्कृत ग्रंथ लिहणारा संभाजी वयाच्या१५व्या वर्षी नखिशख नायिकाभेद सातशतक सारखे हिंदी ब्रीज भाषेत ग्रंथ लिहणारा संभाजी वयाच्या१६व्या वर्षी १०हजार फौजेचकुशल, नेतृत्वकरणारा संभाजीराजा....
१७व्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना साथ देणारा शंभूराजा.
१८व्यावर्षी युवराज झालेला संभाजी
१९व्या वर्षी तुकोबांच्या वारीला संरक्षण देणारा संभाजी.
(तुकाराम महाराजांचे पुञाने ही वारी सुरू केली)
२३व्या वर्षी छञपती झालेला संभाजीराजा.
आणि २३ते३२ या वयात इंग्रज पोतुर्गीज फ्रेंच डच मोगल यांच्याशी प्राणपणाने लढणारा सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा
आिण वयाच्या ३२व्या वर्षी स्वतःच्या देहाच बलिदान करणारा बिलदानी राजा म्हणजे शंभूराजा.
असा होता आमचा शंभूराजा.
शिवरायांचे रक्त जिजाऊंचे संस्कार आणि पाठीशी तुळजाभवानी िवचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी...
एका हातात तलवार एका हातात लेखनी मदार्नी सौंदयार्ची अदा ज्याची देखनी
पाहून अशा राजाला होय काळजाच पाणी
विचार करा त्या संभाजीची काय असेल जवानी......
याच माझ्या कवितांमुळे मी अमोल कोल्हे यांच्या शिवपुञ शंभूराजे या महानाट्यातील, गीते लिहू शकलो.
संभाजी महाराजांबद्दल आणि पराक्रमा बद्दल बोलताना औरंगजेब म्हणतो
अरे मला पाच मुल पण एकही कामाचा नाही
मला जर शिवाच्या पोरासारखा संभाजीसारखा एक जरी मुलगा असता तर हा औरंगजेब आलम दुिनयेचा बादशहा झाला असता. तर औरंगजेबाची बायको उदेपुरीबेगम औरंगजेबाला सांगते आलमिगराची बेगम सांगते आलमिगरा िशवाजी असेल सुर्य तर संभाजी चाँदतारा पण
चंद्रावर दाग आहे संभाजी बेदाग आहे औरंगजेब जरा जपून कारण संभाजी
सह्याद्रीचा वाघ आहे. शञूच्याही मनात ज्याच्या चारिञ्याची निशाणी िवचार
करा त्या संभाजीची काय असेल जवानी......
मला एकदा एकाने विचारलं दत्ता मी ऐकलय संभाजी व्यसनी होते?
म्हटले हो...! संभाजी व्यसनी होते पण शिवभक्तीचे...!
त्यांना व्यसन होते ज्ञानाचे.... त्यांना व्यसन होत आभ्यासाच....
त्यांना व्यसन होत लढाईच... त्यांना व्यसन होत संस्कारांच....
आिण असा होता आमचा राजा.... आपल्या सर्वांना ही हे व्यसन लागावं
कारण ज्याला िशवाजी आिण संभाजी या बापलेकांच व्यसन लागले त्यांना बाकीच्या व्यसनांची गरज नाही. असो.. िशवरायां बरोबरच संभाजी समजून घ्या...!
**************************************************
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!
अॅन्ड्रॉईड अॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 13-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 97 हजार 863 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 933 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399