उपजिल्हा रुग्णालयात पोलिस चौकी सुरु करावी... रुग्णालयातील मे.साठे रामचंद्र डी. या सुरक्षा एजन्सीवर कारवाई व्हावी.... रिपाई नेते डि. राज सर्वगोड
पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना नसून येथील पोलिस चौकी सध्या बंद करण्यात आली आहे. ती सुरु व्हावी. तसेच येथील मे. साठे रामचंद्र डी. या सुरक्षा एजन्सी चे सुरक्षा कर्मचारी सुध्दा येथे हजर नसतात. त्यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी येथील रिपाई चे नेते डी. राज सर्वगोड यांनी प्रशासकीय अधिकायांना याबाबतचे निवेदनपर पत्र देवून यासाठीचा पाठपुरावा सुरु केला आहे.
रिपाई नेते डी. राज सर्वगोड यांनी पोलिस चौकी च्या मागणी बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर यांना दिलेले हे निवेदनपर पत्र...
रिपाई नेते डी. राज सर्वगोड यांनी मे. साठे रामचंद्र डी. या सुरक्षा एजन्सीवर कारवाई करणे बाबत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर चे जिल्हा शल्य चिकीत्सक यांना दिलेले हे निवेदनपर पत्र...
सामाजिक कार्यकर्ते व रिपाई चे नेते डी. राज सर्वगोड हे नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांबाबत आपल्या ‘हटके’ अंदाजाने प्रशासकीय अधिकार्यांना संपुर्ण अभ्यासपुर्ण निवेदन सादर करुन विविध प्रश्नांचा पाठपुरावा करुन ते सोडविण्यासाठी शेवटपर्यंत लढा देत असतात. त्यांच्या वरील कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.