पंढरपूर लाईव्ह
घरासमोरील
ट्रक चोरीस गेल्यानंतर त्याचा विमा क्लेम नाकारणार्या विमा कंपनीस जिल्हा
ग्राहक मंचाने विमा रक्कम व्याजासह द्यावी असा आदेश दिला असुन श्रीराम
जनरल इंन्शुरन्स कंपनीने विम्याची रक्कम 9 टक्के व्याजासह ग्राहकास आदा
करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दत्तात्रय शिवाजी सपकाळ यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम.एच.13 बी.4592
या ट्रकचा श्रीराम जनरल इंन्शुरन्सकडे विमा उतरविलेला होता.25 मे 2011 रोजी
सदर ट्रक घरासमोरुनच चोरीस गेला.या बाबत शहर पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद
दाखल करण्यात आली होती.मात्र विमा कंपनीस कळविण्यास उशीर झाला व ट्रक योग्य
ठिकाणी उभा केला नाही या सबबीखाली कंपनीने क्लेम नाकारला होता.मात्र
कंपनीचा हा दावा खोडुन काढत अॅड.प्रमोद मोहीते व अॅड.सतिश झिरपे यांनी
तक्रारदाराची बाजु योग्य रितीने मांडली होती.त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाने
सदर निकाल दिला असुन तक्रारदारास ट्रकची किंमत 2 लाख 96 हजार 350 रुपये 25
मे 2012 पासुन 9 टक्के द.सा.द.शे दराने व्याजासह द्यावी व खर्चापोटी 2000
रुपये द्यावेत असा आदेश देण्यात आला.
*************
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!
अॅन्ड्रॉईड अॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 4-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 91 हजार 451 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 014 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399