पंढरपूर लाईव्ह (स्पेशल रिपोर्ट)

दि.4 मे 2015


शिवशाहीर म्हणून संबोधले जाणारे बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार जाहीर केला. या पुरस्काराला संभाजी ब्रिगेड व कांही संघटनांनी प्रखर विरोध दर्शविलेला आहे. नेमके काय कारण आहे या विरोधाचे...? काय म्हणणे आहे याला विरोध करणार्‍यांचे..?  पंढरपूर लाईव्ह ने याबाबत मराठा  सेवा संघ महाराष्ट्र चे प्रशिक्षक  शिवश्री अमरजित पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी अमरजित पाटील यांनी आपली कांही रोेख-ठोक मते मांडली. बघा खालील व्हिडीओ...

 

 


‘‘ हा पुरस्कार घोषीत करण्याच्या एक दिवस अगोदरच संभाजी ब्रिगेड, दलित पँथर आदी संघटनांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र देवून यासाठी आमचा विरोध असल्याचे कळविले होते. यानंतर पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या शिष्ट मंडळासमोर पत्रकारपरिषदेत सांस्कृतीक कार्यमंत्री ना.विनोद तावडे यांनी शब्द दिला होता की, 7 तारखेला मंत्रालयात व्यापक बैठक घेवून याबाबत विचार करु. हा पुरस्कार हा महाराष्ट्राच्या नागरिकांचे वतीने दिला जातो यासाठी शासनाला नागरिकांचे मत जाणून घेणे आवश्यक आहे मात्र तसे घडले नाही. ज्या दिवशी ना. तावडे यांनी पुण्यात आश्‍वासन दिले त्याच दिवशी रात्री मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतीक कार्यमंत्र्यांचे अधिकार स्वत: वापरुन हा पुरस्कार पुरंदरेंना दिला जाणार असल्याचे घोषीत केले. हे योग्य नाही.’’ -शिवश्री अमरजित पाटील

***********************


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 4-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 90 हजार 383  हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 881 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399