संभाजी महाराजांचे आचरण हे तत्वशिल होते -श्री.पराशर मोने

पंढरपूर लाईव्ह वृत्त

कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी  महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली प्रारंभी सकाळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन श्री.प्रणव परिचारक, माजी नगरसेवक श्री.नागेश भोसले, श्री.पप्पु पाटील यांनी केले. सायंकाळी ठिक 6.30 वाजता श्री.पराशर मोने यांचे  धर्मयोध्दे श्री.शंभुराजे या विषयावर व्याख्यान झाले.

              

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रणव परिचारक  म्हणाले की, महापुरूषांच्या जयंती सर्वत्र साजर्‍या होतात. महापुरूषांच्या प्रतिमेला हार घालुन फोटो काढणे, कर्णकर्कश आवाजात गोंधळ घालणे हे जयंतीचे स्वरूप बनले आहे. मात्र तरूण पिढीला महापुरूषांचा इतिहास समाजासमोर  यावा आणि त्यातुन प्रेरणा घ्यावी यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संभाजी महाराजांनी  अवघ्या 32 वर्षाच्या जीवनप्रवासात स्वत:च्या कार्याची शौर्यगाथा इतिहासात लिहिली आहे. संभाजी महाराजांसारखी धैर्यपिपासु वृत्ती समाजामध्ये निर्माण झाल्यास शत्रुराष्ट्रांची आपल्या देशाकडे बघण्याची हिमंत ही होणार नाही. 

सदर कार्यक्रमाचे व्याख्याते श्री.पराशर मोने यांचा सत्कार पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक श्री.पुरूषोत्तम खडके यांनी केला.

  

याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.पराशर मोने म्हणाले की,  जिजाऊ नावाच्या संस्कारी विद्यापीठामध्ये छत्रपती शिवराय आणि शंभुराजे घडले. त्यांची बुध्दीमत्ता इतकी आफाट होती की, वयाच्या 14 व्या वर्षी ‘‘बुधभुषणम’’ हा संस्कृतमधील ग्रंथ त्यांनी लिहिला. अवघ्या 32 वर्षाच्या जीवनप्रवासात त्यांनी शत्रुला नमविले, धर्माचे रक्षण केले व प्रसंगी प्राण सुध्दा वेचले. संभाजी राजांचे आचरण हे तत्वशील, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न व
सद्सद्विवेक बुध्दीचे होते,  मात्र शुल्लक निर्मात्यांनी चित्रपटांसाठी त्यांची वेगळी प्रतिमा समाजासमोर सादर केली.  सध्याच्या या युगात कोणत्याही अशौच, अनैतिक  ठिकाणास महाराजांचे नाव देवुन त्यांची प्रतिमा मलीन होत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. अखंड हिंदुस्थानासाठी सर्वांनी एकत्र येऊन कटिबध्द व्हावे. असे प्रतिपादन ही त्यांनी केले.

सदर कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक सचिन डांगे, आदित्य  फत्तेपूरकर, पुरूषोत्तम खडके, रा.पा.कटेकर, शैलेश
बडवे, सुमीत शिंदे, विजय पाटील, योगेश जगताप,  अ‍ॅड.आशुतोष बडवे, बंटी वाघ आदी मान्यवर उपस्थित
होते. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी पप्पू पाटील, विशाल मलपे,  विश्‍वास शिंदे, अमोल डोके, विनायक संगीतराव, शाम गोगाव, दत्तात्रय धोत्रे, राजू कौलवार, सुरज सरवदे, धनंजय मनमाडकर, सचिन कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम चिंचणीकर यांनी  केले. स्वागत मोहन पाटील, प्रास्ताविक प्रणव परिचारक तर आभार गणेश सिंगण यांनी केले.

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

 

आज दि.  रोजी आज दि. 16-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 99 हजार 727 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  16-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 162झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399

आज दि.  रोजी आज दि. 15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 99 हजार 276 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 102 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399