पंढरपूर (प्रतिनिधी):-
इसबावी येथील
डॉ. द. ता. भोसले सार्वजनिक वाचनालय व जिव्हाळा सेवाभावी संस्था, पंढरपूर
यांचे वतीने देण्यात येणार्या साहित्य व साहित्य सेवा पुरस्काराची घोषणा
आज करण्यात आली. या वर्षी साहित्य व साहित्य सेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव
मागवण्यात आले होते. त्यातून साहित्य पुरस्कारासाठी विजय पाडळकर, पुणे
यांच्या ‘कवीची मस्ती’ या कादंबरीची तसेच बालिका ज्ञानदेव, पुणे यांच्या
‘मॅगझिनीतून सुटतेय गोळी’ या कविता संग्रहास व चंद्रकांत पोतदार, कोल्हापूर
यांच्या स्वप्नांच्या पडझडीनंतर या काव्यसंग्रहांना विभागून पुरस्कार
जाहीर करण्यात आला.
साहित्य व सांस्कृतीक सेवेसाठी देण्यात येणारा साहित्यसेवा पुरस्कार ‘ग्रंथाली’ प्रकाशन, मुंबई चे
विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांच्या कार्यासाठी साहित्यसेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कारासाठी दहा प्राध्यापक व साहित्यीकांची कमिटी नेमण्यात आली होती. त्यांनी हे पुरस्कार जाहीर केले. पुरस्काराचे स्वरुप प्रत्येकी 11 हजार 111 रु. रोख, सन्मानचिन्ह व शाल-श्रीफळ असे आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार दि. 17 मे 2015 रोजी सायंकाळी 5:30 वा. मा.डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष-अखिल भारतीय साहित्य संमेलन , घुमान, पंजाब) व मा.श्री. यशवंतराव गडाख (माजी खासदार व साहित्यीक) यांचे शुभहस्ते ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे व मा.डॉ.द.ता.भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीसंत तनपुरे महाराज मंगलधाम सभागृह, स्टेशन रोड, पंढरपूर येथे संपन्न होत आहे. तरी परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी या समारंभास उपस्थित रहाण्याचे आवाहन जिव्हाळा परिवाराचे अध्यक्ष अॅड.भारत भोसले व वाचनालयाचे अध्यक्ष कल्याणराव शिंदे यांनी केले आहे. सदर प्रसंगी डॉ.द.ता.भोसले, प्रशांत वेळापूरे, डॉ.वामन जाधव, भास्कर बंगाळे, बी.डी.पारसे, प्रा.धनाजी चव्हाण, प्रा.देवानंद सोनटक्के आदी उपस्थित होते.