पंढरपूरातील स्विमींग टँक मध्ये बुडून तरुणाचा मृत्यु स्विमींग टँक च्या व्यवस्थापनाबाबत पंढरपूरकर नाराज...!

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)

दि. 3 मे 2015

आज दि. 3 मे 2015 रोजी पंढरपूर नगरपरिषदेच्या स्विमींग टँक मध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.   स्विमींग टँक च्या व्यवस्थापनामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे असे प्रकार घडण्याची दाट शक्यता होती. या ठिकाणी पोहण्यास जाणार्‍या अनेक पंढरपूरकरांनी याबाबत येथील कर्मचार्‍यांना सुचना करुनही याकडे दुर्लक्ष झाल्याने पंढरपूरकर सदर टँकच्या व्यवस्थापनाबाबत नाराज असल्याची चर्चा आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुळचा आग्रा येथील रहिवाशी असणारा  आकाश चौधरी  (वय अंदाजे 21) हा स्टेशनरोडवरील ‘कदम ज्वेलर्स’ मध्ये गेल्या दोन महिन्यापासून कामास होता. आज रविवारी दुकानला सुट्टी असल्यामुळे तो याच दुकानातील काही कामगार मित्रांसमवेत येथील पद्मावती नजीक असलेल्या नगरपरिषदेच्या स्विमींग टँकमध्ये पोहण्यास गेला होता. दरम्यान दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्याचा टँकमध्ये पाण्यात बुडून मृत्यु झाला. याबाबत मयत आकाश चा कदम ज्वेलर्स मधील कामगार मित्र सागर दत्ता मंडले याने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  मृतदेह पोष्टमार्टमसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेेलेला असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे ए.एस.आय. बी.के.शिंदे हे करत आहेत.

पंढरपूर लाईव्ह ला मिळालेल्या माहितीनुसार सदर स्विमींग टँकमध्ये सर्वत्र शेवाळ साठलेले असून कांही ठिकाणी कठडे सुध्दा तुटलेले आहेत. कांहीजण येथे जखमी सुध्दा झालेले आहेत. टँकमधील पाणी वेळेत बदलणे आवश्यक असते मात्र ते वेळीच न बदलल्यामुळे पाण्यात शेवाळ साठते. शेवाळामुळे पोहण्यास अडथळा निर्माण होतो. अशी माहिती अनेक नागरिकांनी दिली. प्रारंभीपासूनच सदर स्विमींग टँक च्या व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्‍नचिन्हे उपस्थित केली गेली होती. मागे सुध्दा एका तरुणाचा असाच दुर्दैवी मृत्यु घडल्याची घटना घडलेली असूनही स्विमींग टँक च्या व्यस्थापनाबाबत नगरपरिषद प्रशासनाने गंभीरपणे विचार करुन आवश्यक त्या उपाययोजना केल्या नसल्याने याबाबत पंढरपूरकर नाराज आहेत.


*******

पंढरपूर लाईव्ह च्या दर्शकांच्या प्रतिकिया बघा...

Kajal Thanki May the soul rest in eternal peace nd may God give strength to bear the irreparable loss .

Aashutosh Choudhary · 3 mutual friends
Band krun taka swimming pool
 
 
Aashutosh Choudhary · 3 mutual friends
Band krun taka swimming pool
 
Yashwant Dombali वाईट घडले .
2 hrs · Unlike · 1
 
Shri Samadhan Wagh ya agodar pan ya swimming tank made 2 mule meli ahet
2 hrs · Unlike · 1
 
Moin Iliyas Shaikh Nit kara nahi tar Band kara
1 hr · Unlike · 3
 
Pravin Dethe Its very bad news
1 hr · Unlike · 1
 
Shankar Bhusnar Panduranga khup khup vaet zhale.
1 hr · Unlike · 1
 
Priti Vibhute Ppur kontich soy neet nahi. Na raste na road light , na traffic rule ani atta swimming pul.....
 
Shankar Bhusnar Right mam.
 
 
 
 
        
 
 

****


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 3-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 89 हजार 053 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 659 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399