सा.झंझावात प्रस्तुत ‘पंढरपूर लाईव्ह’ पत्रकारितेतील पुढचे पाऊल...!

नमस्कार...
पंढरपूर लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत...

हल्ली सर्वसामान्य जनतेस दैनंदिन जीवनात अत्यावश्यक माहिती व इतर बर्‍याच बाबी  सोशल मिडीयाद्वारे एका टच वर मिळत आहेत. मी गेली कित्येक वर्ष भारत सरकार मान्यता प्राप्त असलेले साप्ताहिक ‘झंझावात’ च्या माध्यमातून पत्रकारितेत कार्य करत आहे. सा.झंझावात प्रस्तुत ‘पंढरपूर लाईव्ह’  च्या रुपाने ़या क्षेत्रातील पुढचे पाऊल आम्ही उचललेले आहे. पंढरपूरकरांसाठी व येथे येणार्‍या भाविक-भक्तांसाठी उपयुक्त पडेल अशी सर्व माहिती व ताज्या दैनंदीन बातम्या तत्परतेने प्रसिध्द  करण्यासाठी ़‘पंढरपूर लाईव्ह’ चे हे ई-न्युज वेब पोर्टल आणि अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप सर्वांना निश्‍चितच आवडेल अशी अपेक्षा आहे.

अल्प काळातच ‘पंढरपूर लाईव्ह’ चे ई-न्युज वेब पोर्टलला भेट देणार्‍या दर्शकांची संख्या लाखाच्या आसपास झालेली असून लवकरच तब्बल 10 हजार मोबाईल मध्ये अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचेल. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. आम्ही हाती घेतलेल्या या कार्यास आपणा सर्वांचे सहकार्या अत्यावश्यक आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ ला सहकार्य करणारे आमचे सर्व हितचिंतक, जाहिरातदार, दर्शक व मित्रपरिवाराचे आम्ही आभारी आहोत.
आपला

मुख्य संपादक
- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक- 8308838111/8552823399
ई-मेल

jhanjavat@gmail.com

livepandhrpur@gmail.com

Web-  www.pandharpurlive.com